बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटतोय; वाचा आजची आकडेवारी

नवी दिल्ली | देशात गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवलेला पाहायला मिळला होता. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच देशात वेगानं लसीकरण सुरु करण्यात आलं. यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. अशातच काल देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

देशभरात सध्या 4 लाख 6 हजार 822 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना झालेल्या 3 कोटी 19 लाख 34 हजार 455 रुग्णांपैकी 3 कोटी 10 लाख 99 हजार 771 रुग्ण बरे झाले. शनिवारी देशात 39,070 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

तसेच आतापर्यंत देशभरात 4 लाख 27 हजार 862 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. अलिकडे काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोना निर्बंधातून शिथीलता देण्यात आली आहे.

दरम्यान, भारतात लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. देशात आतापर्यंत 50 कोटी 68 लाख 10 हजार 492 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. त्यात आता नवा डेल्टा प्लस व्हायरस आल्याने अजून चिंतेत भर पडली आहे.

थोडक्यात बातम्या –

तेजस ठाकरे माझ्या डोक्याबाहेरचा विषय, ते…- छगन भुजबळ

“मोदी सरकारला त्यांच्या विचारसरणीचे न्यायाधीश हवेत, म्हणून 7 वर्षांपासून पदे रिक्त आहेत”

भररस्त्यात महिलेने कारचालकाला केली बॅटने मारहाण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

खुशखबर! आता मोफत गॅस कनेक्शन मिळणार, वाचा काय आहेत नियम?

‘न्यूड सीन दिले नाही म्हणून माझं करिअर संपलं’; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More