देश

कोविड रूग्णालयात भीषण अग्नितांडव!; 8 कोरोना बाधीत रूग्णांचा होरपळून मृत्यू

अहमदाबाद | गुजरातमधील कोविड रूग्णालयाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदाबाद शहरातील एका खासगी हाॅस्पिटलला लागलेल्या आगीत 8 रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. नवरंगपुरामधील श्रेय हॉस्पिटलात लागलेल्या या भीषण आगीनं परिसरात एकच खळबळ माजली आहे.

श्रेय हाॅस्पिटलातील जवळपास 40 कोरोना बाधीत रूग्णांना आता उपचारासाठी दुसऱ्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हॉस्पिटलातील आयसीयू विभागात आग लागल्यानं हा दुर्दैवी प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. हाॅस्पिटलातील या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला आता यश मिळालं आहे.

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “अहमदाबादमधील हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेने दु:खी झालो आहे. याबाबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि अहमदाबादचे महापौर बिजल पटेल यांच्याशी चर्चा केली आहे. प्रशासनाकडून सदर घटनेतील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना मदत केली जाईल.” असं मोदींनी यावेळेस सांगितलं आहे.

 

दरम्यान, रूग्णालयातील 40 अन्य कोविड पॉझिटिव्ह रूग्णांना वाचविण्यात यश आलं असून आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी यावेळेस दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भूमीपूजन सोहळा पार पडताच शिवसेनेची मोठी घोषणा, संजय राऊतांना केलं ऐलान…

…म्हणून आईनंच मुलांसह स्वतःच्या हाताच्या धारदार ब्लेडनं नसा कापल्या; खळबळजनक घटना!

जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी वर्णी लागलेले मनोज सिन्हा कोण आहेत? जाणून घ्या…

भूमीपूजन सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले….

माझं दैवत गेलं…. अनिलभैय्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचा आमदार ढसाढसा रडला…!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या