Top News देश

“कोरोना गेल्या 100 वर्षांतलं सर्वात मोठं आर्थिक आणि आरोग्याचं संकट”

नवी दिल्ली | कोरोना हे गेल्या 100 वर्षांतील सर्वात गंभीर आरोग्यविषयक आणि आर्थिक संकट असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झालाय त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिलीये. ‘एसीबीय बँकिंग अँड इकॉनॉमिक्स कॉनक्लेव्ह’ या आयोजित व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये दास बोलत होते.

“आपली अर्थव्यवस्था आणि आर्थिक प्रणाली किती मजबूत आहे या कोरोनाच्या काळात आपण दाखवून दिलंय. आपल्या आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवरील शतकातील हे सर्वात वाईट संकट आहे. नोकरीपासून दैनंदिन कामांवरही त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे,” असं दास यांनी सांगितलं.

शक्तिकांत दास म्हणाले की, “फेब्रुवारी 2019 पासून आतापर्यंत आरबीआयनं 115 बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे. वृद्धी दरात झालेल्या घसरणीतून सावरण्यासाठी तशा प्रकारची पावलं उचलण्यात आली आहेत. याबाबत मॉनिटरी पॉलिसी कमिटी रिझॉल्युशनमध्येही सांगण्यात आलं आहे. कोरोना संकटानं अनेकांचे प्राणही गेले आणि अनेकांच्या जीवनशैलीवर त्याचा परिणामही झाला.”

“रिझर्व्ह बँकेचं विकासालाच प्राधान्य आहे. तसंच आर्थिक स्थिरताही तितकीच महत्त्वाची आहे. कोरोना महामारीमुळे एनपीएमध्ये वाढ होईल आणि भांडवलातही घट होईल. त्याचप्रमाणे लॉकडाऊननंतर हळूहळू निर्बंध उठवले जात असून त्याचे चांगले परिणाम दिसू लागलेत. संकटाच्या काळात भारतीय कंपन्या आणि उद्योगांनीही उत्तम काम केलं असल्याचं दास यांनी स्पष्ट केलं.

विकास दुबे संबंधीच्या बातम्या-

विकास दुबेच्या लव्हमॅरेजची रक्तरंजीत कहाणी; सासू-सासऱ्यांचा विरोध असा काढला मोडून

अंत्यविधीनंतर विकास दुबेची बायको भडकली, संतापाच्या भरात केलं ‘हे’ धक्कादायक विधान!

पोलिसांनी विकास दुबेचा एन्काऊंटर केला खरा, मात्र आता ‘या’ अजब गोष्टीची एकच चर्चा!

शरद पवार मुलाखत स्पेशल बातम्या-

सरकारस्थापनेबाबत भाजपशी चर्चा झाली होती का?, शरद पवारांचा गौप्यस्फोट म्हणाले…

तुम्ही या सरकारचे हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल?; शरद पवारांचं आश्चर्यकारक उत्तर

तेव्हा मात्र मला मोठा धक्काच बसला अन् समजलं की…..- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या