बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असतानाच आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं आहे.

आज दिवसभरात राज्यात 6 हजार 843 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, 05 हजार 212 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात दिवसभरात 123 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 60,35,029 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 96.33 टक्के एवढा झाला आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात 94 हजार 985 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 31 हजार 552 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोना हळूहळू आटोक्यात येत असताना नव्या डेल्टा प्लस या विषाणूने महाराष्ट्रात डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राज्य सरकारतर्फे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या-

उर्वरित आयपीलचा मुहूर्त ठरला, या तारखेपासून पुन्हा रंगणार आयपीएलचा थरार!

धक्कादायक! महाराष्ट्रात महापुरामुळे बळी पडलेल्यांचा आकडा 137 वर

मुंबईकरांनी करून दाखवलं; कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

“गाडी चालवत पंढरपुरला जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्याही पाहाव्यात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More