मुंबई | भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा गुरुवारी प्रसिद्ध केला आहे. यामध्ये बिहारमधील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची मोफत लस देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
भाजपाने बिहारमध्ये मोफत लसीची घोषणा केल्यावर बिहारचे निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना याबाबत सवाल केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रालाही मोफत लस मिळायला हवी असं म्हटलं आहे.
फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रालाही मोफत लस देणं गरजेचं आहे. काही लोकं महाराष्ट्र सोडून जगभर बोलत आहेत. तामिळनाडूतील राज्य सरकारने मोफत कोरोना लसीची घोषणा केलीये. तर आता हे दुटप्पी लोक टीका करतायत.”
“कोरोना व्हायरस संदर्भात केंद्र सरकार नक्कीच योजना आणणार आहे. मात्र यामध्ये राज्याने देखील भर घालावी लागेल,” असंही फडणवीस यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
“रोहित पवारांनी समाजकारण नाही तर धंदा केला”
अनेकांना भाजप सोडण्याची इच्छा आहे पण….- एकनाथ खडस
राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्याचा प्रमुख फोडला तरी त्याचा उपयोग होणार नाही, कारण…- राम शिंदे
मुंबई- सिटी सेंटर मॉलचे दोन मजले जळून खाक; आदित्य ठाकरेंची घटनास्थळी भेट
महाराष्ट्रातील जनतेला मोफत कोरोना लस देऊ- नवाब मलिक
Comments are closed.