बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लस घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता मेडिकलमध्येही मिळणार ‘या’ दोन लस

नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशभरामध्ये लसीकरण मोहिम राबवली जात आहे. केेंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून लस घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्यातच आता लसीकरणाला वेग मिळावा याकरिता आता खासगी बाजारातही लसी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

Covishield आणि Covaxin  या दोन लसींना ड्रग्ज कंट्रोलर ऑफ जनरल  DCGI कडून मंजूरी देण्यात आली आहे. दोन्ही लसींना मान्यता मिळाल्याने आता मेडिकल स्टोअरमध्येही इतर औषधांप्रमाणेच कोरोना लस मिळू शकणार आहेत. Covishield आणि Covaxin या दोन्ही लसींची किंमत 275 इतकी असण्याची शक्यता आहे. मात्र, लसींची किंमत ठरल्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

दोन्ही कंपनीच्या निर्मिती कंपन्यांनी सीरम आणि भारत बायोटेकने यासाठी परवानगी  मागितली होती. सीरम इन्स्टिट्युटचे संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी 25 ऑक्टोबर रोजी DCGI कडे  कोविडशिल्डला खुल्या बाजारात विक्रीच्या मंजुरीसाठी अर्ज केला होता. तसेच भारत बायोटेकचे संचालक व्हि. कृष्णमोहन यांनीही प्री क्लिनिकल आणि क्लिनिकल डेटासह माहिती सादर केली होती.

दरम्यान, सद्यस्थितीमध्ये खासगी रूग्णालयांत Covaxin  या लसीसाठी प्रतिडोस 1200 रूपये इतके आकारले जातात. तर सीरमच्या कोविशील्ड लसीसाठी 780 इतके शुल्क आकारले जाते. तर संपुर्ण देशभरात निशुल्क लसीकरणाचं सरकारी अभियानही सुरूचं राहणार असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘माझ्या ब्राचे माप देव घेत आहे’; श्वेता तिवारीच्या वक्तव्यानं खळबळ

“बिग बॉसमुळे माझे आयुष्य खराब झाले, माझे करिअर संपविण्याचीही धमकी मिळाली”

लाखो जणांच्या दिलाची धडकन असणारी अभिनेत्री मौनी राॅय अखेर अडकली लग्नबंधनात

‘लघु, सुक्ष्म दिलासा’! मिलिंद नार्वेकरांचा नितेश राणेंना खोचक टोला

IPL 2022 ! किंग कोहली पुन्हा कर्णधार होणार?; आरसीबीने स्पष्टच सांगितलं…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More