बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Covishield की Covaxin? ओमिक्राॅनवर कोणती लस प्रभावी?, तज्ज्ञ म्हणतात…

नवी दिल्ली | दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) समोर आलेला ओमिक्रॉन व्हेरियंटने (Omicron variant) जगाची चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंट पेक्षा Omicron variant पाचपट अधिक बलशाली म्हणजेच संसर्गजन्य आहे. Omicron variant अधिक संसर्गजन्य असला तरी त्यापासून अधिक धोका नसल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. Omicron variant वर कोणती लस अधिक प्रभावी आहे, असे प्रश्न लोकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

युनिव्हर्सल हॉस्पिटलचे डॉ. शैलेश जैन (Dr. Shailesh Jain) यांनी सांगितलं आहे की, Omicron variant पाच नविन म्युटेशन्स घेऊन आला आहे. कोविशिल्ड (covishield)  आणि कोवॅक्सिन (Covaxin) दोन्हींच्याही लसीकरणाने Omicron variantचा प्रभाव कमी होईल. तसेच डॉ. जैन म्हणाले की, कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन ओमिक्रॉन व्हेरियंट विरोधात नक्कीच प्रभावी ठरणार  आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटबाबत सतर्कता बाळगताना बुस्टर डोसचाही (Booster dose) आग्रह त्यांनी केला आहे. डॉ. जैन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना ही माहिती दिली आहे.

ओमिक्रॉनची लागण झालेल्या रूग्णांंमध्ये आतापर्यंत कोणत्याही गंभीर समस्या आढळून आल्या नाहीत. सामान्य लक्षणे रूग्णांमध्ये दिसून आली आहेत. कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूची लक्षणे सामान्य असली तरीदेखील जास्त घातक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिनोम सिक्वेसिंग अहवालानंतरच यासंदर्भात तज्ज्ञांना अंदाज लावता येणार आहे.

दरम्यान, देशात होत असलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या संसर्गामुळे लोकांच्या मनात तिसऱ्या लाटेविषयी भीतीचे वातावरण आहे. ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून, कोरोनाविषयक नियमांच पालन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. आतापर्यंत देशात ओमिक्रॉनची लागण झालेल्या 30 केस समोर आल्या आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील रूग्णसंख्या 10 इतकी आहे. टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, लसीकरण या फॉर्म्युल्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सुचना केंद्र सरकारने याअगोदर दिलेल्या आहेत.

थोडक्यात बातम्या- 

सुप्रिया सुळे मॅडम, हा महाराष्ट्र आहे, आमच्या छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना…”

ना बँडबाजा, ना वरात! जितेंद्र आव्हाडांच्या लेकीच्या लग्नाची एकच चर्चा

सुप्रिया सुळे म्हणतात,”माझी केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की…”

आदित्य ठाकरेंचा Dream Project वादात; भाजपने केले भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

हर्षवर्धन पाटील लेकीसह राज ठाकरेंच्या भेटीला; समोर आलं ‘हे’ कारण

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More