बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाविरुद्धच्या लढाईत आता गायीची मदत, अमेरिकन कंपनीनं केला ‘हा’ मोठा दावा

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा नायनाट करण्यासाठी, त्यावर लस शोधून काढण्यासाठी साऱ्या जगात प्रयत्न सुरु आहेत. अनेक कंपन्यांनी लस सापडल्याचा आणि तिची टेस्टिंग सुरु असल्याचा दावा केला आहे. मात्र अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका दाव्यानं साऱ्या जगाचं लक्ष त्यांच्याकडे खेचलं गेलं आहे. या शास्त्रज्ञांनी कोरोनाविरुद्ध नवं हत्यार मिळाल्याचा दावा केला आहे आणि हे हत्यार दुसरं तिसरं काही नसून गाय आहे…

गायीच्या शरीरातील अँटिबॉडीजचा वापरा कोरोनाला समाप्त करण्यासाठी केला जाऊ शकतो. अमेरिकेतील एका बायोटेक कंपनीनं हा दावा केला आहे. सैब बायोथेराप्यूटिक्स असं या कंपनीचं नाव आहे.

जेनेटिकली मॉडिफाईड गायीच्या शरीरातील अँटिबॉडीज काढून त्याचा वापर कोरोनाला नष्ट करण्याचं औषध बनवण्यासाठी केला जाऊ शकतो, असा सैब बायोथेराप्यूटिक्स कंपनीचा दावा आहे. यासंदर्भात लवकरच क्लिनिकल ट्रायल सुरु करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील संसर्गजन्य रोगांचे चिकित्सक अमेश अडलजा म्हणाले की, हा दावा खूप सकारात्मक, विश्वासार्ह आणि आश्वासक आहे. कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या अस्त्रांची आवश्यक आहे. गायीच्या अँटिबॉडीजचा वापर जर कोरोनाला रोखण्यासाठी होत असेल तर यासारखी चांगली गोष्ट नाही.

शास्त्रज्ञ सहसा प्रयोगशाळांमध्ये तयार केलेल्या पेशी किंवा तंबाखूच्या पानावर अँटिबॉडीज तपासून पाहत असतात. मात्र बायोथेरपीटिक्स गेल्या 20 वर्षांपासून गायींच्या खुरांमध्ये अँटिबॉडीज तपासण्याचं काम करत आहे आणि ते यामध्ये प्रसिद्धही आहेत.

कंपनी गायींमध्ये अनुवांशिक बदल करते, जेणेकरून तिच्या रोगप्रतिकारक पेशी अधिक वाढू शकतील, ज्यामुळे त्या धोकादायक आजारांशी चांगल्या प्रकारे लढू शकतील. तसेच या गायी मोठ्या प्रमाणात अँटीबॉडी तयार करतात ज्याचा उपयोग मानवांना आजारातून बरं करण्यासाठी देखील केला जातो.

पिट्सबर्ग विद्यापीठाचे रोगप्रतिकार तज्ज्ञ विल्यम किलमस्ट्र्रा म्हणाले, की या कंपनीच्या गायींच्या अँन्टिबॉडीजमध्ये कोरोना विषाणूचे स्पाइक प्रोटीन नष्ट करण्याचे सामर्थ्य आहे. गाय स्वतः बायोरिएक्टर आहे. भयंकरातील भयंकर रोगांविरुद्ध लढण्यासाठी ती मोठ्या प्रमाणात अँन्टिबॉडीज बनवते.

एसएबी बायोथेरपीटिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एडी सुलिवान यांनी सांगितले, की इतर छोट्या जीवांपेक्षा गायींमध्ये रक्त जास्त असते म्हणून गायीच्या शरीरात अँन्टिबॉडीज देखील जास्त तयार होतात. जी नंतर सुधारली जाऊन माणसांमध्ये वापरली जाऊ शकतात.

एडींनी सांगितलं, की जगातील बहुतेक कंपन्या कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी मोनोक्लोनल अँन्टिबॉडीज विकसित करत आहेत. गायींमधील चांगली गोष्ट म्हणजे ते पॉलिक्लोनल अँन्टिबॉडीज बनवतात. कोणत्याही विषाणूच्या नायनाट करण्यासाठी त्या कोणत्याही मोनोक्लोनल अँन्टिबॉडीजपेक्षा अधिक सक्षम आहेत.

एडी सुलिवान म्हणाले, की जेव्हा मिडल ईस्ट रेस्पीरी सिंड्रोम (एमईआरएस) आला होता, तेव्हा आम्ही हा मार्ग निवडला होता. तिथून आम्हाला कळले की गायीच्या शरीरातील अँन्टिबॉडीजमध्ये इतर जीवांच्या अँन्टिबॉडीजपेक्षा जास्त शक्ती असते.

सुलिवान म्हणाले, की कोरोना विषाणूविरूद्धच्या अँटीबॉडीज 7 आठवड्यांमध्ये गायीच्या शरीरात तयार होतात. यावेळी गाय फार आजारी पडत नाही. तपासणी केल्यावर असे दिसून आले की गायीच्या शरीरात तयार केलेल्या अँटीबॉडीजमुळे कोरोना विषाणूच्या स्पाइक मारल्या जात आहेत.

प्रयोगशाळेत जेव्हा गायीच्या प्लाझ्माची चाचणी घेण्यात आली, तेव्हा असे आढळले की ते मानवी प्लाझ्मा थेरपीपेक्षा चार पट अधिक शक्तिशाली आहे. यामुळे कोरोना विषाणू मानवी शरीरात प्रवेश करू देत नाही.

एडीने सांगितले, की काही आठवड्यात गायींच्या अँटीबॉडीजच्या क्लिनिकल चाचण्या सुरू होतील. जेणेकरून मनुष्यामध्ये ते किती प्रभावी आहे हे आम्हाला समजू शकेल. आम्हाला आशा आहे की गाईच्या रक्तामधून काढलेल्या अँटीबॉडीज इतर औषधे आणि उपचारांपेक्षा चांगली असेल.

ट्रेंडिंग बातम्या-

वारकऱ्यांमध्ये अजित पवार यांचा दुजाभाव, प्रकाश आंबेडकर यांनी केली ‘ही’ प्रमुख मागणी

शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

राज्यात 2553 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती…

कोरोनाचे रूग्ण वाढत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपेंची राज्याला मोठी गुडन्यूज…!

देशात मोदींना आणि राज्यात ठाकरेंना राजकीय नेतृत्व दाखविता आले नाही, त्यांनी…- प्रकाश आंबेडकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More