मुंबई | महाराष्ट्रावर ‘कोरोना’ची आपत्ती ओढवली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करणारे भाजप नेते निरंजन डावखरे यांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खडेबोल सुनावले आहेत. संकटाच्या काळात तरी तुमचं राजकारण ‘होम क्वारंटाईन’ करा, असा सल्ला रोहित पवारांनी दिला आहे.
राजकारण आम्हालाही करता येतं, पण आज ती वेळ नाय्ये. संकटाच्या काळात तरी तुमचं राजकारण ‘होम क्वारंटाईन’ करा. तुमचा एवढा ‘अभ्यास’ आणि अनुभव असेल तर मदत करायला तुम्हाला अडवलं कुणी?’ असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला. अभ्यास या शब्दाला अधोरेखित करत रोहित पवारांनी फडणवीसांच्या ‘अभ्यास सुरु आहे’ या प्रसिद्ध वाक्यावरही टोला लगावला.
सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची गरज आहे.’ असं डावखरे यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये गेलेले नेते निरंजन डावखरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्तुती करणारं ट्वीट काल केलं होतं.
राजकारण आम्हालाही करता येतं, पण आज ती वेळ नाहीय. संकटाच्या काळात तरी तुमचं राजकारण ‘होम क्वारंटाईन’ करा. तुमचा एवढा ‘अभ्यास’ व अनुभव असेल तर मदत करायला तुम्हाला अडवलं कुणी? https://t.co/8Q6Oh5Bmyv
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 20, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
कॉल ड्रॉप होत नाही अशी मोबाईल सेवा सरकारनेच सुचवावी- संजय राऊत
आता नवऱ्याला कधीच नाही सांगू शकणार ही गोष्ट; दोषी अक्षयच्या पत्नीची इच्छा अपूर्ण
महत्वाच्या बातम्या-
अन्नदात्यासाठी अन्नत्याग… साऱ्या महाराष्ट्रात झाले अन्नत्याग आंदोलन
कंपन्यांनी कोणत्याही कर्मचाऱ्यांचा पगार कापू नये- नरेंद्र मोदी
Comments are closed.