दुचाकी बाईक चालवण्याआधी ही बातमी वाचा; या लोकांवर होणार थेट कारवाई

New Rule l गेल्या कित्येक वर्षांपासून रस्ते अपघातात बळींची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यांदर्भात आता केंद्र सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार देशभरात निकृष्ट दर्जाच्या दुचाकी हेल्मेटवर कारवाई करण्याचा विचार करत आहे. निकृष्ट दर्जाचे हेल्मेट हे रस्ते अपघातात मृत्यू आणि जखमी होण्याचे प्रमुख कारण आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने देखील याबाबत राज्यांना पत्र पाठवले आहे.

केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय :

राज्यांना पाठवलेल्या पत्रात केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जिल्हाधिकाऱ्यांना ISI नोंदणीशिवाय हेल्मेट विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारने आपल्या पत्रात म्हटले आहे की, हेल्मेट बीआयएस प्रमाणपत्राशिवाय रस्त्याच्या कडेला विकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हे रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे.

बीआयएस लायसन्स आणि बनावट आयएसआय मार्क नसलेले हेल्मेट तयार करून विकणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची गरज असल्याचे या पत्रात म्हटले आहे, जे नियमांचे उल्लंघन करत आहेत. निकृष्ट दर्जाचे हेल्मेट बनविणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोहीम राबवण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या देण्यात आले आहेत.

New Rule l 2022 मध्ये रस्ते अपघातात 25228 लोकांचा मृत्यू :

भारतात बनवलेल्या औद्योगिक उत्पादनांना ISI चिन्ह दिले जाते. हे दर्शविते की एखादे उत्पादन भारतीय मानक ब्युरो (BIS) ने विकसित केलेल्या भारतीय मानकांशी सुसंगत आहे. भारतात सरकारने दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. दुचाकीवर दोन जणांना बसण्याची परवानगी असून दोघांनीही हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. एवढेच नाही तर वाहन कंपन्यांकडून दुचाकी खरेदी करताना हेल्मेटही दिले जाते.

जगात सर्वाधिक दुचाकी भारतात वापरल्या जातात. केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये देशात 63115 रस्ते अपघातांमध्ये 25228 लोकांचा मृत्यू झाला. यातील सर्वाधिक अपघात 2021 मध्ये दुचाकी वाहनांमुळे झाले असून त्यात 22786 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2023 च्या तुलनेत, 2024 मध्ये रस्ते अपघातात 20.4% आणि मृत्यूंमध्ये 10.7% वाढ झाली आहे.

News Title : crackdown on faulty helmets Action to goverment

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपचं टेन्शन वाढलं; विधानसभेसाठी मनसेचे दोन उमदेवार जाहीर, पाहा कोण आहेत?

“राज ठाकरेंना तुरुंगात टाकलं पाहिजे”; प्रकाश आंबेडकरांची थेट मागणी

रक्षाबंधन बनवा खास; तुमच्या बहिणीला गिफ्ट द्या ‘हे’ स्वस्तात मस्त स्मार्टफोन

रेल्वे विभागात नोकरीची मोठी संधी; तब्बल ‘इतक्या’ पदांसाठी बंपर भरती

12 उपक्रमशील शिक्षकांना विनोबा पुरस्कार प्रदान!