देशभरात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी?; सर्वोच्च न्यायालय आज देणार निर्णय

नवी दिल्ली | देशात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. आज या याचिकेवर न्यायालय निर्णय देणार आहे. 

गेल्या वर्षी दिल्ली आणि लगतच्या भागात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. ध्वनी आणि वायू प्रदुषणामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर देशभरात याच निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

केंद्र सरकारने सरसकट फटाके बंदीला विरोध दर्शवला आहे. त्याऐवजी मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. 

दरम्यान, याप्रकरणी न्यायालय आता काय निर्णय देते?, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-…नाहीतर मराठा समाज पुन्हा आक्रमक होईल; मराठ्यांचा इशारा  

-शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपची नवी रणनीती?

-‘एमआयएम’नंतर आता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध!  

-या सरकारने जलयुक्त शिवारातून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे- सुप्रिया सुळे  

-चंद्रकांत पाटलांनी सांगितला मंत्री होण्याचा फायदा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या