बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला राज ठाकरेंची चिंता; पत्राद्वारे केली मास्क घालण्याची विनंती

मुंबई | शिवाजी पार्कमध्ये एका आयोजित कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आले होते. यावेळी त्यांनी मास्क लावला नव्हता. याबाबत पत्रकारांनी विचारलं असता मी मास्क लावतच नाही. तुम्हालाही सांगतोय, असं राज ठाकरे म्हणाले होते. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यानं राज ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईट क्रास्टो यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी राज ठाकरे यांना मास्क परिधान करण्याची विनंती केली आहे. राज ठाकरेंवर टीका न करता एक चाहता आणि प्रशंसकाच्या रुपात काळजीपोटी विनंती करत असल्याचं क्रास्टो यांनी म्हटलं आहे. भल्याही आपल्या राजकीय विचारधारा सारख्या नसतील, पण तुमच्या भाषण कौशल्यामुळे आणि व्यंग्य चित्रामुळे मी तुमच्याशी जोडला गेल्याचंही क्रास्टो यांनी सांगितलं आहे.

राजसाहेब, तुम्ही लोकांसाठी एक प्रेरणा आहात, आपण जे बोलता त्या प्रत्येक शब्दाचं पालन आणि अनुकरण केलं जातं. आपला एका मोठा चाहता वर्ग आहे. आपण त्यांचे गुरू, मित्र आणि मार्गदर्शक आहात. आपली भाषणं केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशात पाहिली जातात. त्यामुळे कोविड विरुद्धच्या लढाईत आपली भूमिका फार महत्त्वाची ठरते. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, की राजसाहेब तुम्ही मास्क घाला, असं क्रास्टो म्हणाले.

देशात कोरोना पुन्हा वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरे यांनी सार्वजानिक ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य करणं, सार्वजानिक हित्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते, कारण राज ठाकरेंचे लाखों चाहते, कार्यकर्ते त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून त्यांना फॉलो करू शकतात, असं क्लाईट क्रास्टो यांनी पत्रात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ऑनलाईन सत्र सुरू असताना वकिलाचा कॅमेरा ऑन राहिला अन्…, पाहा व्हिडिओ

बारामतीच्या ‘त्या’ रिक्षाचालकाच्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य आलं समोर!

‘कृषी कायदे मागे घेऊन सरकारने माझी शेवटची इच्छा पूर्ण करावी’; दिल्लीत आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

पोलीस कर्मचाऱ्याच्या छळाला कंटाळुन पत्नीनंतर पतीनेही केली आत्महत्या!

“राज्यात भाजपची सत्ता कधीही येऊ शकते”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More