New Rule l आजकाल नागरिक क्रेडिट कार्डचा वापर जास्त प्रमाणात करतात. अगदी तिकीट बुकिंग करण्यापासून ते घराचे भाडे आणि मुलांची शालेय फी भरण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी वापरले जात आहे. अशा परिस्थितीत काही बँका आता कॅशबॅकपासून क्रेडिट कार्डवर शुल्क भरण्याच्या नियमात बदल करणार आहेत. अशा 4 बँकांच्या नियमांमधील हे बदल जून महिन्यापासून लागू होणार आहेत. या चार बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा, येस बँक, आयडीबीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांचा समावेश आहे. तर या बँका क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये काय बदल करणार आहेत ते जाणून घेऊयात …
या बँकांच्या नियमांत केले अनेक बदल :
बँक ऑफ बडोदाने आपल्या BOB कार्ड वनच्या नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. BOB CARD One ने त्याच्या को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्सवरील व्याज दर तसेच विलंब शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँक नियमांमधील हा बदल 26 जून 2024 पासून लागू होणार आहे. आता ग्राहकांना विलंबाने पैसे भरल्यास किंवा मर्यादेपेक्षा जास्त कार्ड वापरल्यास काही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.
आयडीएफसी फर्स्ट बँक क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही 20,000 रुपयांपेक्षा जास्त युटिलिटी बिल पेमेंट केल्यास, आता फीवर एक टक्के फी आणि जीएसटी देखील आकारला जाणार आहे. तर फर्स्ट प्रायव्हेट क्रेडिट कार्ड, एलआयसी क्लासिक क्रेडिट कार्ड आणि एलआयसी सिलेक्ट क्रेडिट कार्डवर युटिलिटी अधिभार लावला जाणार नाही.
New Rule l अतिरिक्त शुल्काचे नियम बदलले :
येस बँकेने व्यवहारांवर आकारले जाणारे अतिरिक्त शुल्काचे नियम बदलले आहेत. येस बँकेने काही निवडक क्रेडिट कार्डांवरच हा बदल केला आहे. याचा परिणाम येस बँकेच्या त्या क्रेडिट कार्डांवर होईल जे इंधन सह-ब्रँडेड आहेत किंवा त्या श्रेणीतील कार्ड आहेत.
स्विगी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डने आपल्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. आता तुम्हाला Swiggy HDFC बँक क्रेडिट कार्डवर चांगला कॅशबॅक मिळणार आहे. हा बदल 21 जून 2024 पासून लागू होणार आहे. तुम्हाला मिळणारा कॅशबॅक स्विगी ॲपमध्ये स्विगी मनी म्हणून दिसून येईल, जो तुम्ही तुमच्या फूड ऑर्डर बिलावर वापरू शकता.
News Title – Credit card Rules Change
महत्त्वाच्या बातम्या-
जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या!, कालीचरण महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद
या राशीच्या व्यक्तींनी आज भांडणात सहभाग घेऊ नका
..तर तुम्हीही ठरू शकता उष्माघाताचे बळी; ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी
‘या’ तारखेपूर्वी आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करून घ्या; अन्यथा..
“सुप्रिया सुळे आमच्या लीडर होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे..”; शरद पवार गटात राजकीय भूकंप