बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

क्रेडीट कार्डवर मिळणारे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

नवी दिल्ली | आजकाल प्रत्येकाकडे क्रेडीट कार्ड पाहायला मिळतं. मात्र क्रेडीट कार्डचे फायदे प्रत्येकाला माहिती असतातच असं नाही. क्रेडीट कार्डमुळे रोख रक्कम सोबत बाळगण्याची कटकट तर वाचतेच मात्र याशिवाय तुम्हाला तुमचे पैसे वाचवण्यातही हे क्रेडीट कार्ड मदत करतं.

क्रेडीट कार्डमुळे तुम्हाला खरेदी करताना अनेक ऑफर मिळतात. विशेषत: ऑनलाईन खरेदीवर अनेक सवलती मिळतात. अनेक शॉपिंगचे अॅप क्रेडीट कार्डवरून तुम्ही खरेदी केली तर किंमतीत सवलत देतात. अनेक बँकेच्या क्रेडीट कार्डवर काही टक्के सवलत किंवा रिवार्ड अशा ऑफरदेखील दिल्या जातात.

अडचणीच्या काळात तुम्हाला क्रेडीट कार्डवर पैसे काढता येवू शकतात. कर्ज काढण्याचादेखील पर्याय असतो. मात्र त्यासाठी बँक व्याज तर आकारतेच शिवाय वेगवेगळे चार्जेस पण लावते. त्यामुळे कर्जाचा पर्याय थोडा खर्च वाढवणारा ठरू शकतो. मात्र याव्यतिरीक्त क्रेडीट कार्डचा पर्याय अतिशय सोयीस्कर आहे.

अनेकवेळा ठराविक बँकेचं क्रेडीट घेण्यासाठी ती बँक तुम्हाला ऑफरही देते. म्हणजे काहीही पैसे न भरता तुम्हाला तुमचं अकाउंट काढून दिलं जातं. अनेकवेळा फुकट क्रेडीट कार्ड देखील देतात. शिवाय अकाउंटमध्ये मिनीमम बँलेसचीही मर्यादा दिलेली नसते. त्यामुळे क्रेडीट कार्डचा वापर तुमच्यासाठी फायद्याचा ठरणारा आहे.

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांचा घुमजाव

रिझर्व बँकेची एसबीआयवर मोठी कारवाई, ठोठावला तब्बल एवढा दंड

राज्यात आणि देशात काॅंग्रेस सक्षम पर्याय! नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य

पाणीपुरी खवय्यांसाठी खुशखबर! पाणीपुरी खाल्ल्यानं होतो आरोग्याला फायदा

अन् चक्क मंत्र्यांचा हरवलेला चश्मा सापडला महिला उमेदवाराच्या केसात, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More