बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंडे बहिण-भावांमध्ये जुंपली, श्रेयवादासाठी चढाओढ

बीड | परळी येथील डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी उड्डाणपूल (Dr. Shamprasad Mukharjee Flyover)  व छत्रपती संभाजी महाराज चौक (Chatrapati Sambhaji Maharaj Chowk) ते औष्णिक विद्युत केंद्र रस्ता व त्यावरील रेल्वे उड्डाणपूल चौपद्रीकरण या दोन कामांना मिळून केंद्र सरकारतर्फे 100 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यासाठी श्रेय कोणी घ्यावे, यावरुन मुंडे भाऊ आणि बहिणीत जोरदार चुरस सुरु आहे.

राष्ट्रवादीचे (NCP) आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी हा निधी आपल्यामुळेच मिळाले असल्याचे सांगितले. त्यांनी तसे ट्विट देखील केले आहे. तर अशाच प्रकारचे ट्विट भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही केलं आहे.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी हा निधी (Fund) माझ्या प्रयत्नांमुळे मिळाल्याचा दावा केला आहे. शहरातील डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाचे विस्तारीकरण आणि चौपद्रीकरण करण्यासाठी आमच्या मागणीप्रमाणे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्यांचं मुंडे बहिण-भाऊ म्हणाले.

दरम्यान, दोघा भावंडांनी ट्विट करत केंद्रीय वाहतूक मंत्री (Ministery of Road Transport and Highways of India) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे आभार मानले. त्यामुळे आता या श्रेयवादावरून मुंडे बहिण-भावात जुंपलेली पाहायला मिळत आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

‘…अन् त्यानंतर मी एकदाही उद्धव ठाकरेंशी बोललो नाही’, उदय सामंत स्पष्टच बोलले

उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून जगदीप धनगड यांना उमेदवारी, शेतकरी पुत्राबद्दल जाणून घ्या सर्वकाही

‘राज्यात हे काय सुरू आहे?’; संजय राऊतांचा थेट राज्यपालांना प्रश्न

“शिंदे यांच्याबद्दल आदरच, पण आमच्या मनातील मुख्यमंत्री तुम्हीच”

डायबिटीस असणाऱ्या पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More