Top News खेळ मनोरंजन

विराट झाला ‘बाप’माणूस! विरूष्काच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन

मुंबई | टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालंय. विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे.

अनुष्का शर्माने आज एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. विराट कोहलीने स्वत:हून सोशल मीडियावर यासंदर्भातील माहिती आपल्या चाहत्यांना माहिती दिलीये.

विराट त्याच्या पोस्टमध्ये म्हणतो, “आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की, आज दुपारी आम्हाला मुलगी झाली. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मनापासून धन्यावाद. अनुष्का आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. सध्या आम्हाला थोडा प्रायव्हसीची गरज आहे.”

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने 11 डिसेंबर 2017 रोजी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत आपली लग्नगाठ बांधली होती.

थोडक्यात बातम्या-

‘हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केली’; भाजप खासदाराचं वक्तव्य

“…तर संजय राऊतांनी राहुल गांधींना सल्ले द्यावे, दोघांची वैचारिक उंची सारखी आहे”

MPSC कडून विविध पदांच्या पूर्व परीक्षांचं नवीन वेळापत्रक जाहीर!

“राजकारणात येण्यासाठी दबाव टाकून मला वेदना देऊ नका”

महाराष्ट्र हादरवणारी घटना; गोंदियावरून पुण्याला जाणाऱ्या 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या