क्रिकेट विश्वातून खळबळजनक बातमी, युवा खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी

Cricket news | क्रिकट विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. क्रिकेट बोर्डाने युवा खेळाडूला पाच वर्षांसाठी बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. एका युवा खेळाडूवर मॅच फिक्सिंगचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणात खेळाडू हा दोषी आढळून आला आहे. त्यामुळे त्याच्यावर तब्बल 5 वर्षांची बंदी (Cricket news) घालण्यात आली आहे.

या युवा खेळाडूचे क्रिकेट करीअर सुरू झालं नाही तेच आता संपण्याच्या मार्गावर आले आहे. हा खेळाडू अफगाणिस्तान संघाचा एहसानुल्लाह जनात आहे. अफगाणिस्ता क्रिकेट बोर्डाने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये त्याच्यावर बंदी घातली आहे. या प्रकरणाची आता एकच चर्चा रंगली आहे.

अफगाणिस्तानच्या युवा खेळाडूवर कारवाई

हा खेळाडू काबुल प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सीझनमध्ये मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता. त्याने ACB आणि ICC अँटी करप्शन कोडचे उल्लंघन केले असून त्याने हे सगळे (Cricket news) आरोप स्वीकारले आहेत. एहसानुल्लाह जनात आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेच्या अनुच्छेद 2.1.1 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला आहे.

या मॅच फिक्सिंगमुळे त्याच्यावर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. जनात याने करण्यात आलेले सर्व आरोप स्वीकारले आहेत. त्याने आपण मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याची कबुली दिली आहे.

अफगाणिस्तान संघाकडून खेळणाऱ्या एहसानुल्लाह (Cricket news) जनातने 2017 मध्ये क्रिकेट जगतात पदार्पण केले. त्याने अफगाणिस्तानकडून 16 वनडे, 1 कसोटी आणि 1 टी-20 सामना खेळला आहे. मात्र, आता त्याच्यावर 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

News Title :  Cricket news Action on cricketer Ihsanullah Janat

महत्त्वाच्या बातम्या-

‘काल ऑलिम्पिक अधिकाऱ्यांनी खेळण्याआधी…’; बजरंग पुनियाची पोस्ट चर्चेत

आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार

खुशखबर! 12 वी पास तरुणांना ‘या’ विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

“नवनीत राणांना आवरा, अन्यथा..”; शिंदे गटाच्या नेत्याचा थेट इशारा

IRCTC चं श्रावण स्पेशल टुर पॅकेज; ‘या’ तीर्थक्षेत्रांना स्वस्तात भेट देण्याची सुवर्णसंधी