Top News खेळ देश

प्रेरणादायी! लेकीसाठी बापाने चक्क शेतात क्रिकेटचं मैदान केलं उभं

Photo Courtesy - Twitter/ spot_the_lights

गांधीनगर| अनेक क्रिकेटपटूंच्या संघर्षाच्या गोष्टी आपण ऐकल्या असतील. क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असतात. पुरूष क्रिकेटपटूंच्या बरोबरच भारतीय महिला क्रिकेटपटू देखील देशाचं नाव गाजवत आहे. फक्त क्रिकेट नाही तर विविध खेळांमध्ये महिला खेळाडू नाव कमवत आहेत. अशाच एका लेकीसाठी एका बापाने चक्क शेतात क्रिकेटचं मैदान उभं केलं.

‘मुस्कान वासवा’ ही गुजरात मधील भरूच जिल्ह्यात राहते. तिचं आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचं स्वप्न आहे. तिचं हे स्वप्न साकार करण्यासाठी तिच्या वडिलांनी शेतात लेकीसाठी क्रिकेटचं मैदान तयार केलं आहे. वडिलांच्या पाठिंब्यामुळे  मुस्कानची नुकतीच गुजरातच्या सीनियर संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या जिल्ह्यात मुस्कान पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

भाऊ आणि वडिलांना बघूनच तिने क्रिकेट खेळायचं ठरवलं. तिचा हा निर्णय तिने घरी सांगितल्यावर घरच्यांनी मुस्कानला त्यांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं. घरी सराव व्हावा यासाठी वडिलांनी शेतीचं रुपांतर मैदानात केलं असल्याचं मुस्कानने सांगितलं. मुस्कानची याआधी जिल्हाच्या अंडर 19 संघात निवड झाली होती. वडिलांच्या प्रयत्नांनंतर तिला बडोदा क्रिकेट असोशिएशनकडून एनओसी मिळवली.

मुस्कानच्या कामगिरीवर तिचे वडिल समाधानी आहेत. माझ्या मुलीची निवड झाल्याने मी खुश आहे. तीने देशासाठी खेळावं आणि देशाचं नाव मोठ करावं, अशी प्रतिक्रिया मुस्कानच्या वडिलांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

कल्याणमध्ये तुफान राडा; काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला शिवसेनेच्या महिला आघाडीनं दिला चोप, पाहा व्हिडिओ

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात तडीपार गुंडांची हातात तलवार घेऊन दहशत, पाहा व्हिडिओ

‘संजय राठोड हे ठाकरे सरकारमधील गजा मारणे’; ‘या’ भाजप नेत्याची गंभीर टीका

“महाराष्ट्राचे इरादे पक्के, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाही”

धक्कादायक! साठ वर्षाच्या ‘या’ खासदाराने केलं 14 वर्षाच्या मुलीसोबत लग्न

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या