ख्रिस गेलसारखा डान्स करा, ५ हजार डॉलर्स मिळवा!

मुंबई | वेस्ट इंडिजचा धडाकेबाज क्रिकेटपटू ख्रिस गेलनं आपल्या इन्टाग्राम खात्यावरुन डान्सचा व्हिडिओ पोस्ट केलाय. जो कुणी असा डान्स करेल त्याला ५ हजार अमेरिकन डॉलर्सचं इनाम त्यानं घोषित केलंय. 

सनी लिओनीच्या ‘लैला’ गाण्यावर ख्रिस गेल थिरकताना दिसतोय. त्याच्या पाठीमागे असलेल्या हिरव्या पडद्यामुळे तो कोणत्यातरी उत्पादनाच्या जाहिरातीचं शुटिंग करत असल्याचं दिसतंय.

दरम्यान, चांगला डान्स करणाऱ्या ५ जणांचा व्हिडिओ गेल स्वतःच्या अकाऊंटवरुन पोस्ट करणार आहे. गेलचे फॉलोवर्स त्यातील सर्वोत्कृष्ठ व्हिडिओ निवडतील.

पाहा गेलचा व्हिडिओ- 

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या