नवी दिल्ली | टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतो. त्याने न्यू इअरच्या सुरवातीलाच आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. हार्दिकने आपल्या इन्स्टाग्रामवरुन अभिनेत्री मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविच सोबतचा फोटो शेअर केला आणि आपल्या अफेअरच्या चर्चांना त्याने पूर्णविराम दिला.
निशा गुप्ता, उर्वशी रौतेला, परिणिती चोप्रा ऐली अवराम या अभिनेत्रींशीही नाव जोडल्यानंतर हार्दिक पांड्याचे नताशासोबत प्रेम प्रकरण सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. गेल्या बऱ्याच काळापासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते. आता अखेर हार्दिकने सार्वजनिकरित्या रिलेशनशीपची कबुली दिली आहे.
पांड्याने नताशासोबतच्या नात्यासंबंधातील वृत्त अनेकदा फेटाळून लावले होते.हार्दिकने शेअर केलेल्या फोटोवर अनेकांच्या कमेंट मिळत आहेत. भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि कृणाल पाड्यांची पत्नी पंखुरी शर्मा यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, ११ ऑक्टोबर रोजी नताशाने हार्दिकसोबतचा फोटो शेअर केला होता. तेव्हाही त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. हार्दिकने त्या चर्चांना विरोध केला होता. आता मात्र या नात्याला भविष्यात नवं नाव मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘सध्या त्यांना तेवढंच कामं आहे’; फडणवीसांच्या टीकेवर जयंत पाटलांचा पलटवार – https://t.co/AVNdydR2tP @Jayant_R_Patil @Dev_Fadnavis @NCPspeaks @BJP4Maharashtra #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
मंत्रिपद न दिल्याने ‘हा’ काँग्रेस आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत?- https://t.co/93Nmru32d4 #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
उपमहापौरपद डावललं; काँग्रेसच्या ‘या’ नगरसेवकाचा राजीनामा – https://t.co/abOxhJQSLE @INCMaharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
Comments are closed.