Hasin Jahan - क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- Top News

क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई | भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने राजकारणात उडी घेतली आहे. मॉडेल असलेल्या हसीन जहांने मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी हसीन जहांचं पक्षात स्वागत केलं. काँग्रेस पक्षात हसीनची भूमिका काय असेल हे अद्याप कळू शकलेलं नाही. 

दरम्यान, हसीन जहांने आपला पती मोहम्मद शमीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले होते. त्याची बाहेर अनेक लफडी असल्याचा गौप्यस्फोटही तीने केला होता. 

शमीने इतर मुलींसोबत बोलतानाच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट तीने सोशल मीडियावर टाकले होते. या प्रकारानंतर ती चर्चेत आली होती. 

महत्त्वाच्या बातम्या-

-‘कमल का फूल, बडी भूल’ नारा देणारा भाजपचा मोठा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार!

-रायगडमध्ये राष्ट्रवादी संपली, शेतकरी कामगार पक्ष संपत चालला आहे!

-शिवसेनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीश्वरांकडे साकडं!

-राजू शेट्टी महान माणूस; त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं- सदाभाऊ खोत

-गोव्यात काँग्रेसला जोरदार धक्का… 2 आमदारांचा राजीनामा; भाजपध्ये प्रवेश करणार?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा