टीम इंडियाला धक्का, ‘या’ दिग्गज खेळाडूने तडकाफडकी घेतली निवृत्ती

Cricketer Rishi Dhawan Retirement

Rishi Dhawan Retirement | टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिका गमावल्यानंतर आणि फलंदाजीत अपयशी ठरल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला प्रचंड टार्गेट करण्यात येत आहे. दोघांनीही आता निवृत्ती घ्यावी, असा सल्ला देखील त्यांना दिला जातोय. अशातच टीम इंडियाच्या एका खेळाडूने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हा खेळाडू दूसरा-तिसरा कुणी नसून ऋषी धवन आहे. (Rishi Dhawan Retirement)

गेल्या 9 वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर असलेल्या ऋषी धवनने निवृत्ती जाहीर केली आहे. 2016 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केले होते, याशिवाय त्याची गोलंदाजी आयपीएलमध्येही गाजली होती. धवन याने सोशल मीडिया पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली.

ऋषी धवनने घेतली निवृत्ती

हिमाचल प्रदेश क्रिकेट संघाचा कर्णधार आणि टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू ऋषी धवनने निवृत्ती घेतली आहे. 34 वर्षीय धवनने आपल्या निवृत्ती पोस्टमध्ये म्हटले की, ‘भारतीय क्रिकेटमधील मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहे’. म्हणजेच आता तो विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसणार नाही.

रविवारी धवनच्या नेतृत्वाखालील हिमाचल प्रदेशने आंध्र प्रदेशचा 8 गडी राखून पराभव केला. या विजयात धवनने उत्तम कामगिरी केली. त्याने पहिले 2 विकेट घेतले. त्यानंतर त्याने 45 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यानंतर धवनने निवृत्ती जाहीर केली. ऋषी धवनने आपल्या पोस्टमध्ये बीसीसीआय, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन, त्यांचे सहकारी आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. (Rishi Dhawan Retirement)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rishi Dhawan (@rishidhawan19)

ऋषी धवनची कारकीर्द

तसेच आयपीएलमध्ये भाग घेतलेल्या पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या फ्रँचायझींचेही त्याने आभार मानले आहेत. ऋषी धवनचा शेवटचा आयपीएल संघ पंजाब किंग्स होता, पण यावेळी त्याला कोणत्याही फ्रेंचायझीने विकत घेतले नाही. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार मोठी नाही.

त्याने टीम इंडियासाठी 2015 मध्ये वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. जानेवारी 2016 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात, त्याने 3 एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये तो फक्त 12 धावा करू शकला. तसेच त्याने फक्त 1 च विकेट घेतली होती. धवनने आपल्या लिस्ट ए कारकिर्दीत 134 सामन्यांमध्ये 2906 धावा आणि 186 विकेट्स घेतल्या. तर, 135 टी-20 सामन्यांमध्ये 1740 धावा आणि 118 विकेट्स अशी त्याची कामगिरी राहिली आहे. (Rishi Dhawan Retirement)

News Title :  Cricketer Rishi Dhawan Retirement

महत्वाच्या बातम्या –

आज शनीचा उत्तरभाद्रपद नक्षत्र ‘या’ राशींना करणार धनवान!

‘खासदाराची चड्डी सुद्धा…’; पोलीस अधिकाऱ्याच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटने पोलीस दलात खळबळ

“भिकाऱ्यांची संख्या वाढली, साई प्रसादालयात मोफत जेवण बंद करा”

धस सुसाट, मौनी दादांनाही मधे ओढलं, फडणवीसही दम देईनात, कारण काय?

घटस्फोट झाल्यास चहलच्या बायकोला ‘इतक्या’ कोटींची पोटगी मिळणार?

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .