बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वीरूसोबत फलंदाजीला आलेल्या ‘या’ खेळाडूने क्रिकेट बोर्डावर केले मानसिक शोषणाचे आरोप!

नवी दिल्ली | भारताला 19 वर्षाखालील विश्वचषक देणारा खेळाडू उन्मुक्त चंदने चार महिन्यांपुर्वी निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर आता तो अमेरिकेकडून क्रिकेट खेळणार असल्याचं उन्मुक्त चंदने सांगितलं होतं. अशातच उन्मुक्त चंदने दिल्ली क्रिकेट असोसिएशनवर गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत.

मी चार महिन्याअगोदर भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेेण्याचा विचारही केला नव्हता. परंतु दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या घाणेरड्या राजकारणामुळे मी भारत सोडून अमेरिकेत जाण्याचं निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी मागच्या बाकड्यावर बसून राहणं मानसिक शोषण होतं, कारण ज्यांना संधी मिळत होती त्यांना मी माझ्या क्लबमधील संघातही सामील करत नव्हतो, असं खळबळजनक वक्तव्य उन्मुक्त चंदने केलं आहे.

मागील मोसमात मला आयपीएलमधील दिल्लीकडून एक ही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. पुन्हा तेच तेच त्यामुळे मला संघात खेळण्याची संधी मिळेल का? हेसुद्धा माहित नव्हतं. मागची काही वर्ष माझ्यासाठी खुप कठीण होती, असंही उन्मुक्त चंद यानं स्पोर्ट्स क्रीडाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. विशेष म्हणजे चंदच्या नेेतृत्वाखाली भारताने 2012 साली झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकला होता.

दरम्यान, उन्मुक्त चंद हा आयपीएलमध्ये दिल्ली संघात भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागबरोबर सलामीला आला होता. तसेच प्रथम श्रेणींमध्ये 120 सामन्यात दमदार फलंदाजी करत त्याने 41.33 च्या सरासरीने 4505 धावा ठोकल्या आहेत. आयपीेएलमध्ये 21 लढतीत 300 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब या संघांकडून खेळला होता.

 

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! संजय राठोडांना दिलासा; ‘त्या’ प्रकरणात मिळाली क्लिन चीट

बैलगाडा शर्यतीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा; म्हणाले…

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

जेतेपदावर नाव कोरण्यासाठी कोहलीचा नवीन डाव?, संघात केले ‘हे’ मोठे बदल

‘गुन्हा दाखल करायचा असेल तर…’; खासदार संभाजीराजे भोसले कडाडले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More