महाराष्ट्र

“महिलांवरील अत्याचारांबाबत कठोरात कठोर पावलं उचला”

मुंबई | अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना तातडीने कायदेशीर आणि आर्थिक मदत देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्राधान्य दिलं आहे. महिलांवरील अत्याचार प्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचं कळतंय.

महिलांवरील अत्याचारांबाबत कठोरात कठोर पावलं उचलण्यात यावीत. तसेच जलद कारवाई करून गुन्हेगारांना वचक बसेल असं काम करावं, असं मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मागील काही काळात निर्भया फंडमधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. या निधीचा तात्काळ कशा पद्धतीने विनियोग करता येईल, याची कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांविषयी आदर वाटेल आणि त्याचबरोबर दरारा वाटेल अशा पद्धतीने काम करावं. आवश्यक असेल तेंव्हाच बळाचा वापर करावा, असंही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या