बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज कुंद्रा प्रकरणी क्राईम ब्रांचच्या तपासात धक्कादायक माहिती समोर!

मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला 19 जुलै रोजी अश्लील चित्रपट निर्मिती रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या तपासातून धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

राज कुंद्रा आणि रायन थॉर्पे यांच्याकडून जो लॅपटॉप जप्त करण्यात आला होता, त्यामधून डेटा मोठ्या प्रमाणात डिलीट केल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याच्या काही दिवसानंतर हा डेटा डिलीट केला गेल्याची माहिती आहे.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार हा डेटा राज कुंद्राच्या सांगण्यावरून हटवला गेला. या दोघांच्या लॅपटॉपवरुन जो 48 टीबी डेटा मिळाला आहे, त्यातून क्राईम ब्रँचला अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत.

दरम्यान, राज कुंद्राच्या बँक खात्याच्या तपासणीत गुन्हे शाखेला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. कुंद्राच्या बँक खात्यातून अनेक वेळा परदेशी बँक खात्यात मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार झाल्याचीही माहिती आहे.

थोडक्यात बातम्या-

“हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा पेगॅसस वेगळं नाही, तिथे माणसं मेली, इथे स्वातंत्र्य मेलं”

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना शक्य ती मदत करावी- नाना पटोले

नवविवाहित जोडप्यावर काळाचा घाला, अपघातात वधूवरासह सहा जणांचा मृत्यू

कोकण, पश्चिम महाराष्ट्रामधील मृत्युतांडव, अश्रूतांडव शब्दापलीकडचं- तुकाराम मुंढेराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट; सक्रिय रुग्णांसह नवी रुग्ण संख्या आटोक्यात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More