‘बागेश्वर महाराजांवर गुन्हा दाखल…’, नागपूर पोलिस आयुक्तांकडून महत्वाची अपडेट समोर
मुंबई | सध्या बागेश्वर धाम सरकार(Bageshwar Dham Sarkar) या नावानं प्रसिद्ध असलेल्या धीरेंद्र शास्त्री(Dhirendra Shastri) महाराजांची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. या महराजांच्या दिव्य शक्तीला सलाम करत अनेकजण त्यांचा जयजयकार करत आहे.
असं असलं तरी बागेश्वर महाराज अंधश्रद्धा पसरवत आहेत, असं म्हणत त्यांना काहीजण विरोधही करत आहेत. त्यातच नागपूरमध्ये बागेश्वर धाम यांनी दिव्य दरबारात केलेल्या वक्तव्यांमुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख शाम मानव यांनी केली होती.
आता या संदर्भात नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळं हे बागेश्वर महाराज महाराष्ट्रात पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहेत.
पोलिस आयुक्तांनी सांगितलं आहे की, बागेश्वर महाराजांविरोधात जादुटोणा कायदा आणि ड्रग अ्ॅंड रेमडीज कायद्यानुसार कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही.
पुढं पोलिस आयुक्त असंही म्हणाले की, आम्ही धीरेंद्र शास्त्री यांचा व्हिडीओ व्यवस्थित पाहिला आहे. त्या व्हिडीओमध्ये कोणताही चुकीचा प्रकार आढळला नाही, त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही.
आमच्या या निर्णायाविरोधात श्याम मानव यांच्याकडं न्यायालयात जाण्याचा मार्ग आहे. त्यावर सध्या मी काहीही प्रतिक्रिया देणार नाही, असंही नागपूर पोलिस आयुक्त म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.