Crime News | बंगळूरुमध्ये (Bengaluru) एका डॉक्टरला (doctor) व्हॉट्सॲपवर (WhatsApp) आलेल्या मेसेजने (message) धक्का बसला. सहाना नावाच्या महिलेने सासूला मारण्यासाठी औषध देण्याची मागणी केली. या मेसेजनंतर डॉक्टरने थेट पोलीस स्टेशनमध्ये (police station) तक्रार दाखल केली. (Crime News)
महिलेचा व्हॉट्सॲप मेसेज
डॉ. सुनील कुमार हेब्बी (Dr. Sunil Kumar Hebbi) यांना १७ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता अनोळखी नंबरवरून ‘हाय’ असा मेसेज आला. त्यांनी प्रतिसाद दिल्यानंतर, महिलेने तिचे नाव सहाना असल्याचे सांगितले आणि ती बंगळूरुमध्ये राहत असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी तिच्या तब्येतीबद्दल विचारल्यावर तिने, “तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं आहे,” असा रिप्लाय दिला. त्यानंतर तिने सासूला मारण्यासाठी औषध देण्याची मागणी केली.
डॉक्टरांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, “तू जे बोलत आहेस ते चुकीचं आहे. मी असं काही करू शकत नाही. रुग्णाचा जीव वाचवणं हे आमचं कर्तव्य आहे, त्याचा जीव घेणं नाही.” त्यांनी सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून नंबर मिळवणे आणि त्याचा दुरुपयोग करणे चूक असल्याचेही सांगितले. मात्र, महिलेने वारंवार मेसेज करून औषधाची मागणी सुरूच ठेवली.
पोलिसांत तक्रार
डॉक्टर हेब्बी यांनी संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. डॉक्टर हेब्बी म्हणाले, “मुलीने ज्या व्हॉट्सॲपवरून मेसेज पाठवला त्यावर डिस्प्ले पिक्चरही (display picture) दिसत नाहीये. मी सामाजिक कार्यात सामील होतो, तसंच भ्रष्टाचाराच्या विरोधातही मोहीम चालवतो, त्यामुळे मला विरोधाचा सामना करावा लागतो. मला चिंता आहे, की कुणीतरी मला यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे.”
डॉक्टर पुढे म्हणाले, “सहाना नावाच्या कोणत्याही मुलीला मी ओळखत नाही. तिने माझा नंबर इन्स्टाग्राम पोस्टवरून (Instagram post) घेतला. आम्ही एकमेकांना ओळखत नाही आणि याआधी भेटलेलोही नाही. पाच मिनिटं आम्ही बोललो, त्यानंतर तिने फोन करून माझी माफी मागितली आणि पोलीस तक्रार न करण्याची विनंती केली. तिने सासू त्रास देत असल्याचे कारण सांगितले.” (Crime News)
Title : crime News Doctor Receives Shocking Message from women