बॉयफ्रेंड मिळताच पत्नीने काढला पतीचा काटा, धक्कादायक प्रकार बघून पोलिसही झाले शॉक

Crime News | छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पती-पत्नीचे नाते हे तसे आयुष्यभराची एक साथ असते. मात्र, याच नात्याला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. अशात या नात्यात कुणी तिसरा आला तर ते नाते एका वेगळ्याच वळणावर जाते. मग, पुढे यातून विकृत कृत्य केले जाते. अशीच एक घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे.

रायपूरमधील बस्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत 10 जून 2024 ला केसरी गार्डनजवळ खरुण नदीत पोलिसांना एक मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी आता अत्यंत खळबळजनक खुलासा समोर आला आहे.

पत्नीनेच बॉयफ्रेंडला हत्या करण्यास सांगितले

मिळालेल्या माहितीनुसार, या मृत व्यक्तीचा त्याच्याच पत्नीने काटा काढल्याची माहिती समोर आली आहे. मृत व्यक्तीच्या पत्नीनेच तिच्या प्रियकराला ही हत्या करण्यास सांगितलं होतं. या प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

खरुण नदीत 10 जूनरोजी पोलिसांना (Crime News) एक मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्याचे फोटोही जवळच्या पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांनी मृत व्यक्तीची ओळख पोलिसांना पटली.

‘असा’ करण्यात आला कट

शवविच्छेदन अहवालामध्ये या व्यक्तीची हत्या झाल्याची माहिती उघड झाली. त्यानंतर याचा तपास करण्यात आला. पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीचे कॉल डिटेल्सदेखील तपासले. त्यानंतर पोलिसांना खुनाचं रहस्य उलगडलं. ही हत्या महिलेच्या प्रियकराने त्याच्या साथीदारासोबत केल्याचं उघड झालं. या महिलेनेच पतीची हत्या करण्यासाठी प्रियकराला सांगितले होते, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली.

महिलेचा प्रियकर आणि त्याचा मित्र यांनी तिच्या पतीला सोबत दारू पिण्यासाठी बोलावले होते. या तिघांनी निर्जन केसरी बागेजवळ बसून मद्यप्राशन केलं. अशात मद्यधुंद अवस्थेत असताना महिलेच्या प्रियकराने आणि त्याच्या मित्राने पतीच्या डोक्यावर लोखंडी स्लॅबनं वार केले. यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला. हा खून (Crime News) करण्याचा कट पोलिसांना महिलेच्या कॉल डिटेल्सवरून समजला. ती ज्या व्यक्तीबरोबर सर्वाधिक बोलायची तोच तिचा प्रियकर असल्याचं पोलिसांना नंतर समजलं आणि पुढे हत्येचा सर्व कट उघड झाला.

News Title : Crime News in Chhattisgarh

महत्त्वाच्या बातम्या-

इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी सरकार देणार सबसिडी?, मोठी माहिती आली समोर

मोठी बातमी! प्रसिद्ध गायिका अलका याग्निक दुर्मिळ आजारानं त्रस्त, दोन्ही कान..

“छगन भुजबळांचं उभं आयुष्य गोरगरीबांचं आरक्षण हिसकावण्यात गेलंय”

“विठ्ठलाच्या नावाने दरोडा…”, जितेंद्र आव्हाडांचा सरकारला टोला

अजितदादांचं भाजपला होतंय ओझं?, अजितदादांबाबत पुनर्विचार होणार…