“आता तुला फक्त उचललंय, नंतर…”; ठाकरे गटाच्या नेत्याचं भर चौकातून अपहरण

Crime News | महाराष्ट्रातील नांदेड शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील ठाकरे गटाच्या एका नेत्याचं अपहरण करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाला बंदूकीच्या धाकानं जबरदस्तीनं गाडीत बसवून नेत अपहरण करण्यात आलं. या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News)

बीडमधील सरपंचाची हत्या व अपहरण प्रकरण ताजे असतानाच आता हा नवीन गंभीर प्रकार उघड झाला आहे. नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाला जबरदस्ती गाडीत बसवून नेल्याने मोठी खळबळ उडाली. इतकंच नाही तर, अपहरण केल्यानंतर या नेत्याला जीवे मारण्याची देखील धमकी देण्यात आली.

नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या नेत्याचं अपहरण

नांदेड येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख गौरव कोडगिरे यांचे शुक्रवारी बाफना टी पॉईंटवरून बंदुकीचा धाक दाखवत अपहरण करण्यात आले होते. राजकीय नेत्याबद्दल बोलशील तर याद राख, जमीन विक्रीचे धंदे बंद कर, अन्यथा जीवे मारेन अशा धमक्या देखील त्यांना देण्यात आल्या. (Crime News)

गौरव कोडगिरे यांचे अपहरण झाल्यानंतर काही तासांतच त्यांची सुटका करण्यात आली. रात्री 9 च्या सुमारास बाफना टी पॉइंटजवळून त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण केल्यानंतर आरोपींनी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. याबाबतची माहिती स्वत: कोडगिरे यांनी दिली आहे.

जीवे मारण्याच्या धमक्या-

कोडगिरे यांना अशाप्रकारे अज्ञातांनी उचलून नेल्यानंतर चालकानं तातडीनं फोन करून कोडगिरे यांच्या पत्नीला घटनेची माहिती दिली. यानंतर त्यांच्या पत्नीनं चालकासह इतवारा पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. हे अपहरण नेमकं कुणी केलं, याची कसलीही माहिती समोर आली नाही. मात्र, त्यांना आता विविध धमक्या दिल्या जात आहेत.राजकीय नेत्यांविरोधात बोलू नको, अन्यथा जीवे मारू, प्रॉपर्टीचे खरेदी विक्री व्यवहार बंद कर, अशा धमक्या कोडगिरे यांना देण्यात आल्या. या प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. (Crime News)

News Title – Crime News nanded Gaurav Kodagire kidnapped

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ वरिष्ठ नेत्याची तब्येत बिघडली, दिल्लीत उपचार सुरू

भुजबळ ते धनंजय मुंडे.., राष्ट्रवादीचे ‘हे’ आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ?

सर्वाधिक मंत्रीपदे भाजपालाच, शिंदे-अजितदादांच्या वाट्याला किती खाती?; यादीच आली समोर

शाहरुख खानमुळे ‘पुष्पा’ एका दिवसात जेलमधून बाहेर; किंग खानने काय खेळी खेळली?

एकाच रात्रीत अल्लू अर्जुन तुरुंगातून सुटला, आता पुढील कारवाई काय?