स्वतःच्या घरातील 8 जणांना कुऱ्हाडीने… बातमी वाचून काळजाचा थरकाप उडेल

Crime News | मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडला. ग्राम बोदल कछार गावात बुधवारी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास ही भयानक घटना घडली. एकाच कुटुंबातील हत्येने एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबातील व्यक्तीने एक दोन नाहीतर तब्बल 8 जणांना कुऱ्हाडीने संपवलं. त्यानंतर आरोपीने स्वत: देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. (Crime News)

कुटुंबातील तरूणाने 8 जणांना कुऱ्हाडीने संपवलं

मध्य प्रदेशात कुटुंबातील तरूणाने 8 जणांवर कुऱ्हाडीने वार करत त्यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच आरोपीचा नुकताच आठ दिवसांआधी विवाह झाला होता. त्यानंतर आरोपीने पत्नी, आई, बहिण, भाऊ त्याची तीन मुलं या सर्वांची हत्या केली.

सर्व पीडित झोपेत असताना मध्यरात्री आरोपीने त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:चं जीवन देखील संपवलं आहे. याप्रकरणामुळे आता मोठ्या प्रमाणात गावामध्ये पोलिसांचा फौजफाटा असल्याचं पाहायला मिळत आहे.

घडलेल्या घटनेचा विचार करता संपूर्ण गावात दहशतीचं वातावरण आहे. आरोपीचं नाव हे दिनेश आहे त्याचं वय हे (27) आहे. वर्षभरापासून आरोपीची मानसिक स्थिती चांगली नव्हती अशी माहिती समोर आली आहे. उपचारानंतर तो सामान्य आयुष्य जगत होता. मागच्या आठवड्यात 21 मे रोजी त्याचा विवाह झाला होता. लग्नानंतर त्याला पुन्हा एकदा मानसिक त्रास झाला. (Crime News)

मोठा भाऊ श्रावण, आरोपीची पत्नी बारातो बाई, आई सिया बाई, श्रावणची तीन मुलं आणि लहान बहिण या सर्वांना कुऱ्हाडीने वार करून संपवलं आहे. हे सर्व घराच्या अंगणात झोपले होते. त्यावेळी आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. (Crime News)

आरडाओरड झाल्यानंतर तो पळून गेला

त्यावेळी दिनेशने तिच्या नातवावर हल्ला केला. तो जखमी झालाय. आरडाओरड झाल्यानंतर दिनेश पळून गेला आणि त्याने गळफास घेत जीवन संपवलं असल्याची माहिती काका तलवी सिंह पटेल यांनी दिली.

News Title – Crime News Of Madhya Pradesh In Young Man Killed 8 Family Members

महत्त्वाच्या बातम्या

पुणे अपघात प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना नवा आदेश; मंत्री-आमदार-खासदार सगळेच अडचणीत!

…म्हणून अभिनेता इम्रान खानने केला घटस्फोट; तब्बल 5 वर्षांनी केला खुलासा

मलायकाने भररस्त्यात केलं असं काही की… व्हिडीओ तूफान व्हायरल

तुला पाहिजे तेवढे पैसे घे; कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट

मनोज जरांगे विरोधात ‘त्या’ तरुणाने असं काय केलं?…म्हणून बसला बेदम चोप