Crime News | इंदूर (Indore) शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या एका 24 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. सूरज पवार (Suraj Pawar) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, प्रेमसंबंध हे आत्महत्येमागील कारण असल्याचे समजते. सूरजने आपल्या इंस्टाग्रामवर (Instagram) “लग्नाच्या शुभेच्छा, तू खुश राहा” अशी पोस्ट करून आत्महत्या केली. (Crime News)
तिंछा फॉल परिसरात आढळला मृतदेह
तिंछा फॉल (Tincha Fall) परिसरात त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत स्थानिकांना आढळला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी सांगितले की, जिथे सूरजचा मृतदेह सापडला, तिथे त्याची दुचाकीही होती. सूरज इंदूरमध्ये मित्रांसोबत राहत होता आणि शुक्रवारी संध्याकाळी मित्रांना न सांगता बाहेर गेला होता.
मित्रांची चौकशी आणि इंस्टाग्राम पोस्ट
पोलिसांनी सूरजच्या मित्रांची चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की, तो घटनेपूर्वी एका मुलीसोबत चॅट करत होता. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर (Instagram Story) एक पोस्ट टाकली होती, ज्यात त्याने लिहिले होते, “लग्नाच्या शुभेच्छा, तू खुश राहा.” ही स्टोरी पाहिल्यानंतर मित्रांना सूरजच्या मानसिक स्थितीबद्दल शंका आली.
मित्रांनी सांगितले की, सूरज ज्या मुलीवर प्रेम करत होता, तिचे लग्न होणार होते. त्यामुळे त्याने अशी पोस्ट केली असावी. पोलिसांनाही या आत्महत्येमागे प्रेमसंबंध असल्याचा संशय आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, मोबाईल डेटाचीही (Mobile Data) तपासणी करत आहेत. (Crime News)
वडिलांचे निधन आणि घरची परिस्थिती
सूरजची घरची परिस्थिती बेताची होती. त्याच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले होते. घरी आई आणि भाऊ राहत होते. त्याचा भाऊ शेती करतो. सूरज कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंदूरमध्ये मित्रांसोबत राहत होता. परंतु, प्रेम आणि मानसिक तणावामुळे त्याने आपले जीवन संपवले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, सूरजने हे टोकाचे पाऊल वैयक्तिक आयुष्यातील समस्यांमुळे आणि मानसिक तणावामुळे उचलले.
Title : Crime News Student Commits Suicide in Indore Due to Heartbreak