महाराष्ट्र हादरला! भररस्त्यात लोखंडी पान्याने वार करत त्याने गर्लफ्रेंडला संपवलं, लोक बघत राहिले

Crime News

Crime News | वसईमध्ये घडलेल्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. वसईमध्ये प्रियकराने प्रेयसीची रस्त्यातच निर्घृण हत्या केली. हत्येचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास वसई पूर्व चिंचपाडा परिसरात घडली आहे.

आरती यादव असे खून झालेल्या मुलीचं नाव आहे. 20 वर्षीय आरतीचा तिचा प्रियकर रोहित यादव याने रस्त्याच्या मधोमध सर्वांसमोर खून केला. या घटनेचा व्हिडीओ रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भररस्त्यात गर्लफ्रेंडला संपवलं

वसईत गौराईपाड्याच्या वाढाण इंडस्ट्रीत कामावर जाणाऱ्या 22 वर्षीय तरुणीवर प्रियकराने लोखंडी पान्याने वार करून हत्या केली. भररस्त्यात आरोपीने सकाळी साडे आठ वाजता तिचा निर्घृण खून केला. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे तरुणीचा मृत्यू झाल्यानंतरही आरोपीने तिच्यावर अनेक वार केले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. दोघेही एकमेकांच्या शेजारी राहत होते. त्यांच्यात प्रेमसंबंध होते पण तरुणीने ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रियकराने तिची हत्या केली.

ब्रेकअप केल्याच्या रागातून हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकराला तिच्यावर संशय होता. तिचं अफेअर असल्याच्या संशयातून त्यांच्यात वादही होत होते. त्यातूनच त्याने लोखंडी पाना डोक्यात मारून हत्या केली. तिच्या डोक्यात 16 ते 17 वार केले आहेत.

तरुणी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडली असताना तिला तु असं का केलंस असंही आरोपी विचारत होता. यानंतर आणखी एक वार त्याने तिच्या डोक्यात केला. पोलिसांनी तरुणाला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

राजकारण तापणार! शिंदे गटाच्या नेत्याचा प्रणिती शिंदेंवर गंभीर आरोप

“ही घराणेशाही नाही, शरद पवार आणि अजित पवारांचं कुटुंब वेगवेगळं”

इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी सरकार देणार सबसिडी?, मोठी माहिती आली समोर

मोठी बातमी! प्रसिद्ध गायिका अलका याग्निक दुर्मिळ आजारानं त्रस्त, दोन्ही कान..

“छगन भुजबळांचं उभं आयुष्य गोरगरीबांचं आरक्षण हिसकावण्यात गेलंय”

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .