वेगवेगळे हॉटेल्स, दारू, वारंवार अत्याचार; ठाण्यातील महिलेसोबत सिंगापूरमध्ये भयंकर कृत्य

Pune News

Crime News | ठाण्यातील (Thane) माजीवाडा येथे राहणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चित्रपटात चांगली भूमिका देण्याचे आमिष दाखवून तिला सिंगापूरला (Singapore) नेण्यात आले आणि तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आला. आरोपींनी पीडितेचे अश्लील व्हिडिओ (Video) चित्रीत करून तिला धमकावले. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. (Crime News)

आरोपी महिलेने रचला डाव

पीडित महिलेची तीन वर्षांपूर्वी एका महिलेशी ओळख झाली होती. आरोपी महिलेने चित्रपटसृष्टीत (Film Industry) वरिष्ठ पदावरील लोकांशी संबंध असल्याचे पीडितेला सांगितले. तिने चित्रपटात चांगली भूमिका मिळवून देण्याचे आमिष दाखवले, आणि पीडितेला सिंगापूरला घेऊन गेली.

सिंगापूरमध्ये अत्याचार

सिंगापूरमध्ये आरोपी महिलेने पीडितेची एका व्यक्तीशी ओळख करून दिली, आणि तो चित्रपटासृष्टीतील मोठा व्यक्ती असल्याचे सांगितले. त्यानंतर, ती व्यक्ती पीडितेला आपल्या घरी घेऊन गेला, तिथे त्याने तिला दारू पाजली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

आरोपीने मुंबईतील (Mumbai) वेगवेगळ्या हॉटेल्समध्येही (Hotel) पीडितेवर वारंवार अत्याचार केला. आरोपी महिलेने पीडितेचे त्या व्यक्तीसोबतचे अश्लील व्हिडिओ चित्रीत केले आणि त्या आधारे तिला धमकावण्यास सुरुवात केली. आरोपी महिलेने पती आणि मुलीला हाताशी धरून पीडितेला फोनवरून धमक्या दिल्या, तसेच वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी भीती घातली.

पोलिसांत तक्रार दाखल

पीडितेने आरोपी महिलेला जातीवाचक शिवीगाळ देखील केली. अखेर आरोपींच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने कापुरबावडी पोलीस ठाण्यात (Kapur Bawadi Police Station) तक्रार दाखल केली. पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. (Crime News)

Title : Crime News Woman Raped on Pretext of Film Role Exploited in Singapore

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .