बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विमानतळ नामकरण आंदोलन भोवलं; नियमांचं उल्लंघन केल्यामुळे 20 हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी ठाणे, रायगड, पालघरमधील स्थानिक भूमीपुत्रांनी मांडली आहे. त्यावरून आता स्थानिक विरूद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे. गुरुवारी सीबीडी येथे मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. या आंदोलनात नवी मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड परिसरातून हजारोच्या संख्येने आंदोलक उपस्थित होते. त्यानंतर या आंदोलनावरून आता पुन्हा नवा वाद रंगण्याची शक्यता आहे.

विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आयोजकांसह 20 हजार आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री उशिरा एनआरआय पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. या आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती. शिवाय आंदोलन प्रमुखांसह प्रमुख समन्वयकांना आंदोलनाआधी नोटीसदेखील बजावल्या होत्या. त्यानंतर देखील आंदोलन करण्यात आलं होतं.

एनआरआय पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, ड्रोनद्वारे चित्रीकरण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणे, अशा विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान,मनसे आमदार राजू पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार जगन्नाथ पाटील, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार सुभाष भोईर, रवींद्र चव्हाण यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

“तुम्ही निवडणुकीचा प्रचार करत होता तेव्हा मी रात्री जागून ऑक्सिजनची व्यवस्था करत होतो”

ठाकरे सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का; निवडणूक पुढे ढकलण्यास आयोगाचा स्पष्ट नकार

‘महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे आरक्षण टिकलं नाही’; दरेकरांचा हल्लाबोल

“मी सीबीआयशी लढतोय अन् तुम्ही माझ्याशी लढण्याची भाषा करता”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More