Top News देश

आता नवऱ्याला कधीच नाही सांगू शकणार ही गोष्ट; दोषी अक्षयच्या पत्नीची इच्छा अपूर्ण

पटना | निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी अखेर चारही आरोपींना आज फाशी देण्यात आली आहे. फाशी देण्यात आलेल्या चार दोषींमध्ये बिहारमधील औरंगाबादचा रहिवासी अक्षय ठाकूरचा समावेश आहे. अक्षयची पत्नी पुनिता आणि लहान मुलाबरोबर गुरुवारी अखेरची भेट होणार होती.

ती नवऱ्याला अखेरचं भेटून त्याच्याकडून घटस्फोट मागणार होती. पण तिची भेट झाली नाही आणि कुटुंबियांना भेटण्याची अक्षयची इच्छा अपूर्ण राहिली. ती नवऱ्याला निर्दोष मानते. आता अक्षयच्या शुक्रवारी अखेरच्या अंत्यसंस्कारानंतरच ती बिहारमध्ये परतणार आहे.  पुनिताने एका वृत्तपत्राला ही माहिती दिली आहे.

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात निर्भया प्रकरणातील दोषींच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्राम सुरू होता. तेव्हा दोषी अक्षयची पत्नी पुनीता आणि स्वत: च्या लहान मुलालाही फाशी देण्याची मागणी करत होती.

दरम्यान, सेलमधून बाहेर आणण्यापूर्वी त्या चौघांना पांढरा कुर्ता-पायजामा परिधान केला होता. चौघांचेही हात मागे बांधले होते. यावेळी दोन्ही दोषींनी हात बांधण्यास नकार दिला होता, मात्र त्यांचं ऐकण्यात आलं नाही.

ट्रेंडिंग बातम्या-

“निर्भयाची आई ही माझी ओळख अभिमानास्पद, आज ती असती तर…”

‘निर्भया’ला अखेर न्याय; सूर्योदयापूर्वी चारही दोषींना फाशी

महत्वाच्या बातम्या-

अन्नदात्यासाठी अन्नत्याग… साऱ्या महाराष्ट्रात झाले अन्नत्याग आंदोलन

कंपन्यांनी कोणत्याही कर्मचाऱ्यांचा पगार कापू नये- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या