बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्ही फक्त कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करायला मुख्यमंत्री झालात का?”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी येत्या दोन दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ, असं म्हणत लॉकडाऊनचे संकेत दिले. यावरून मुख्यमंत्र्यांनी लॅाकडाऊनविषयी जनतेच्या मनात भीती पसरवू नये, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

काल रात्रीचं फेसबुक लाईव्ह नेमकं कशासाठी होतं? मुख्यमंत्र्यांनी वारंवार लॉकडाऊन आणि बेरोजगारी या दोन गोष्टींचा उल्लेख लाईव्हमध्ये केला हे दुर्दैवी आहे. यानं सामान्य जनतेत काय संदेश जातोय? आता जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम सरकारनं करु नये. इथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे आणि तुम्ही लॉकडाऊन- लॉकडाऊन हा काय खेळ लावलाय? वर्षभरात काय केलं तुम्ही?, असा प्रश्न पडळकरांनी उद्धव ठाकरेेंना विचारला.

एक वर्ष झालं तरी तेच तेच पाल्हाळिक बोलताय. कोरोनाचा प्रसार तुम्हाला रोखता आला नाही. हे आतातरी स्पष्टपणे कबूल करा. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? लॉकडाऊन हा पर्याय नाही, लॅाकडाऊन शिवाय करोना नियंत्रणात येईल. पण दरवेळेला जनतेला गृहीत धरुन मनमानी कारभार रेटायचा बंद करा. बरं यातही सगळं लोकांनीच करावं, जनतेनं रोखावं किंवा जबाबदारीनं वागावं, तर मग तुम्ही काय फक्त कपडे बदलून फेसबुक लाइव्ह करायला मुख्यमंत्री झालात का? जनतेला रस्त्यावर उतरून दाखवा म्हणणाऱ्यांनी आधी खुर्चीवरून उतरून दाखवावं, अशी बोचरी टीका पडळकरांनी केलीये.

दरम्यान, सरकारचं सगळं पाप जनतेच्या माथी मारून जनतेलाच ‘बेदरकार’ म्हणायचं, राज्याचे प्रश्न सोडून बंगालमध्ये ममता दीदीनं लावलेल्या ‘दिव्याचं’ कौतुक करायचं आणि महाराष्ट्र सरकारनं केलेल्या अंधाराकडं दुर्लक्ष करायचं असा उठसुठ सामानाच्या अग्रलेखातून बरळणाच्या उद्योग सुरू आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

पाहा व्हिडीओ – 

थोडक्यात बातम्या-

मुलाचं लग्न बघायचं त्यांच्या नशिबातच नव्हतं, 5 दिवस आधीच आई वडिलांना ट्रकनं चिरडलं

“रिषभ पंतला खेळताना पाहिलं की मला माझे सुरुवातीचे दिवस आठवतात”

रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु, पुण्यातील रुग्णालयाची संभाजी ब्रिगेडकडून लाईव्ह पोलखोल

पुण्यात रुग्णांना बेड मिळेना; कोरोना पॉझिटिव्ह आईने मुलासमोर रस्त्यावरच सोडले प्राण

वाढत्या कोरोनामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More