बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयानंतर अभिनेता प्रशांत दामले यांचा सरकारला टोला, म्हणाले…

मुंबई | राज्यात लावण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यासंदर्भात ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर हाॅटेल चालकांना रात्री 10 पर्यंत हाॅटेल सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र सिनेमागृह आणि नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे सिनेकलाकार नाराज असल्याचं दिसून येतंय. त्यावरून आता मराठी अभिनेता प्रशांत दामले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

राज्यातील हाॅटेल मालकांचे, रेस्टाॅरंट मालकांचे आणि जीम मालकांचे हार्दिक आभिनंदन. मोगॅम्बो खूश हुआ… म्हणजे आता लवकरच हळूहळू नाट्यगृह, सिनेमागृह उघडण्याचा शेवटचा (अनावश्यक) टप्पा लवकरच येईल अशी अशा बाळगू या. आता काळजी घ्यायला हवी, अशी उपरोधिक टीका प्रशांत दामले यांनी केली आहे.

त्याचसोबतच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांचे आभार देखील मानले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर सिनेमागृह आणि नाट्यगृह उघडण्याची विनंती कालाकारांनी केली होती. मात्र दुसरी लाट ओसरली असताना देखील सिनेमागृह आणि नाट्यगृह बंदच असल्यानं कलाकार नाराजी व्यक्त करत आहेत.

दरम्यान, सिनेमागृह आणि नाट्यगृह यासोबतच मंदिरं देखील उघडण्याची मागणी करण्यात येत आहे. कलाकार आणि पुजारी वर्गाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्राचा पंंतप्रधान झाला पाहिजे, असं मला अजिबात वाटतं नाही”

“आपण भाग्यवान म्हणून ड्रायव्हिंग लायसन्सवर आपला स्वतःचा फोटो आहे”

सेक्स व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ; भाजपचा बडा नेता अडचणीत!

मायग्रेनने ग्रस्त असलेल्या लोकांनी ‘हे’ खाऊ नये!

पीएफ खातेदारांसाठी मोठी बातमी; लवकरच खात्यात पैसे जमा होणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More