बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘प्राण कंठाशी आलेल्या लोकांना वाली कोण?’; सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर कडाडून टीका

मुंबई | देशात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या कामकाजावर टीका करत कडक पावले उचलली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 12 तज्ज्ञांच्या टास्क फोर्सची राष्ट्रीय समिती स्थापन केली आहे. त्यावरून आता विविध विरोधी पक्ष केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आता शिवसेनेने देखील आपल्या मुखपत्र सामनाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे.

देशात सध्या कोरोनाचा जो हाहाकार सुरू आहे, तो पाहून सर्वोच्च न्यायालयाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते राजकारणातच गुंतून पडले आहेत. आसामच्या मुख्यमंत्रीपदाचा गुंता सोडविण्यात ते मग्न होते. पश्चिम बंगालला ममता यांनी विजय मिळवला असला तरी त्यांचे राज्य त्यांना नीट चालवू द्यायचे नाही. त्यासाठीच्या कारस्थानी कारवायांत वेळ निघून जात आहे, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

कोरोना संकटाशी मुकाबला करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याने सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समितीची स्थापना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने टास्क फोर्सची स्थापना करून केंद्र सरकारच्या नाकामीवर शिक्काच मारला आहे.  प्राण कंठाशी आलेल्या लोकांनी करायचे काय? त्यांचा वाली कोण? सर्वोच्च न्यायालयाचे मन द्रवले व त्यांनी कोरोना युद्धांसाठी 12 तज्ज्ञांची राष्ट्रीय समिती स्थापन केली. या समितीनेच आता कोसळलेल्या आरोग्य यंत्रणांत प्राण फुंकावा, असं देखील या अग्रलेखात म्हटलं आहे.

बिगर भाजपाई सरकार केंद्रात असते तर मुडद्यांच्या राशी व पेटलेल्या चिता पाहून त्यांचे मन द्रवले असते व कोरोनाप्रश्नी एखाद्या राष्ट्रीय सरकारची स्थापना करून मोकळे झाले असते. केंद्राने अशा प्रकारची समिती स्थापन केली असती तर परिवारातले 112 तज्ज्ञ त्यात नेमून गोंधळात भरच टाकली असती, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ जिल्ह्यात लहान मुलांना मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाची लागण

पुण्यात लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य; आजपासून मिळणार लसीचा दुसरा डोस

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी एका क्लिकवर

कोरोना रूग्णांसाठी ‘हे’ प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO चेअरमनची घोषणा

महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात कडक लॉकडाऊनला सुरुवात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More