बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

RSSवर टीका केल्याने जावेद अख्तर यांच्या अडचणीत वाढ; न्यायलयाने पाठवली नोटीस

मुंबई | प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर आपल्या बेधडक शैलीसाठी ओळखले जातात. तालिबानने अफगाणिस्तानात कब्जा मिळवल्यानंतर अनेकांनी तालिबानच्या कृत्याचा निषेध केला होता. तर काहींची या प्रकरणावरून भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला होता. जावेद अख्तर यांनी सुद्धा आरएसएसवर टीका केली होती. आता ही टीका जावेद अख्तर यांना महागात पडताना दिसत आहे.

आरएसएसचे कार्यकर्ते विवेक चंपानेरकर यांनी जावेद अख्तर यांच्याविरूद्ध खटला दाखल केला आहे. आरएसएसची तुलना तालिबानशी केल्याने ठाण्यातील न्यायालयात हा खटला दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. हा खटला दाखल केल्यानंतर आता जावेद अख्तर यांना नोटीस देखील पाठवण्यात आली आहे.

न्यायालयाच्या नोटीसीनंतर त्यांना आता येत्या 12 नोव्हेंबर रोजी त्यांना न्यायालयासमोर हजर रहावं लागणार आहे. तालिबान हे जंगली असून त्यांचे कृत्य निंदानीय आहे. भारतात आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे जे समर्थन करतात ते सुद्धा तालिबान सारखेच आहेत, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, जावेद अख्तर यांनी याआधी देखील भाजप आणि आरएसएसवर कडाडून टीका केली होती. धार्मिक मुद्द्यांवर जावेद अख्तर प्रखरतेने आपलं मत मांडतात. आता ही टीका जावेद अख्तर यांना महागात पडताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

“तुमचं आमचं स्वप्न पुर्ण करायचंय, 2024 ला राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल”

‘शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज’; हसन मुश्रीफ यांची घोषणा

पुढील 2 दिवस महत्त्वाचे! गुलाब चक्रीवादळामुळे ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

“मी खूप नशिबवान, कोरोनामुळे माझा जीव वाचला”

…तर मग कर्णधारची गरजच काय?; KKRच्या ‘त्या’ कृतीवर गौतम गंभीर भडकला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More