बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंतप्रधानपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपरोधिक टोला हाणला आहे.

आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?, झाला असेल तर आत्ताच सांगा नंतर कटकट नको, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी खोचक अशी टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

या भेटीवरून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देताना निशाणा साधला आहे. यावर बोलताना पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन बोलवायला हवं होतं. त्यामध्ये चर्चा करायला हवी होती. चर्चा घडवून आणायला पाहिजे होती. मग त्यांना तुम्ही कधीही भेटा. आता हे भेटून त्यांना काय सांगणार?, असं भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधानांसोबतच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला नेलं असतं तर आनंदच झाला असता, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री-पंतप्रधान यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषेदत फडणवीस बोलत होते.

थोडक्यात बातम्या- 

“ठाकरे सरकारने पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील गरिबांना मदत करावी”

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनामुक्तीच्या दिशेने पुणेकरांचं पहिलं पाऊल, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

कोरोना सेंटरमध्ये साप घुसल्यानं उडाली खळबळ, अन्….

लहान मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट किती घातक असेल?; एम्सच्या संचालकांनी दिली माहिती

पंतप्रधानांसोबतच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला नेलं असतं तर….- देवेंद्र फडणवीस

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More