बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारवर टीका केली म्हणून राजद्रोहाचा खटला भरता येणार नाही; विनोद दुआंवरील गुन्हा रद्दबातल

नवी दिल्ली | माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत देशात मोठी चिंतेची लहर आहे. मागील रिपोर्टनुसार माध्यम स्वातंत्र्यात 180 देशांच्या यादीत भारताचा 142 वा नंबर लागतो. त्यामुळे माध्यमांवर असलेल्या दबावामुळे वस्तुस्थिती झाकली जात आहे. त्याच बरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा देखील मागील काही वर्षांपासून समोर येत आहे. एखाद्या नेत्यावर टीका केली की, ती देशावर टीका केल्याचं मोदी सरकारच्या कार्यकाळात मानलं जात आहे. याच मुद्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दात टीका केली आहे.

काही दिवसांपुर्वी ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली होती. राजद्रोह, सार्वजनिक उपद्रव आणि अपमानकारक साहित्य प्रकाशित करणे यांसारख्या आरोपांखाली पोलिसांनी गेल्या वर्षी 6 मे रोजी विनोद दुआ यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता.त्यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे  देशभरात संपाप व्यक्त केला जात होता. 20 जुलैला न्यायालयाने दुआ यांना कठोर कारवाईपासून संरक्षण दिले होतं. त्यानंतर झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने विनोद दुआ यांना आरोपमुक्त केलं आहे.

सरकारच्या कृतींवर टीका केल्याबद्दल एखाद्या नागरिकावर राजद्रोहाचा आरोप ठेवता येणार नाही, असं न्यायालयानं निकालात म्हटलं होतं. केदारनाथ सिंह प्रकरणातील निकालानुसार प्रत्येक पत्रकार राजद्रोहाच्या आरोपांबाबत संरक्षण मिळण्यास पात्र आहे, असं पत्रकारांच्या भाषण व अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायाधीश उदय लळित व न्यायाधीश विनित सरन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, दहा वर्षांचा अनुभव असलेल्या कुठल्याही पत्रकाराविरुद्ध उच्चस्तरीय समितीच्या परवानगीशिवाय गुन्हा दाखल केला जाऊ नये, अशी विनंती विनोद दुआ यांनी न्यायालयाला केली होती. मात्र न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली आहे.

थोडक्यात बातम्या-

सेक्स रॅकेट प्रकरणात 2 अभिनेत्रींना अटक झाल्यानं बॅालिवूड हादरलं, वाचा संपूर्ण कारवाई

लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी तज्ज्ञांनी पालकांना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला!

मोदींवर नरसिंहराव आणि मनमोहन सिंग भारी, गुंतवणूकदारांना मिळाली सर्वाधिक कमाई

पोस्टाची बंपर योजना, आज पैसे गुंतवा 10 वर्षात 16 लाख मिळवा!

“जेवल्याशिवाय जाऊ नका”, खडसेंचा आग्रह; फडणवीस म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More