बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात हे झारीतले शुक्राचार्य”

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द केलं होतं. हे आरक्षण रद्द केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. भाजपने ओबीसी आरक्षणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर ओबीसी नेेते छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर केंद्र सरकार इम्पेरिकल डाटा देत नसल्याची टीका ठाकरे सरकारनं केली होती. त्यानंतर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्दयावर विजय वडेट्टीवार बोलतात, त्याचबरोबर छगन भुजबळ देखील मोर्चे काढतात मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काही बोलत नाहीत, त्यामुळे यातील कोणतरी झारीतील शुक्राचार्य आहे आणि त्यांना डिसेंबर 2022 पर्यंत आरक्षण द्यायचं नाही, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

छगन भुजबळ मोर्चे काढत आहेत. ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळांनी पुढाकार घ्यावा. भाजप त्यांना नक्की मदत करेल, असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळातील डाटामध्ये 69 लाख चुका आहेत. त्यामुळे सरकारनं नव्यानं डाटा तयार करावा, असा सल्लाही बावनकुळे यांनी दिलाय.

दरम्यान, देशातील ओबीसी नेत्यांना सगळ्यात जास्त भाजपने प्रतिनिधित्व दिलं आहे. 2019 मध्ये तात्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अध्यादेश काढून आरक्षण टिकवलं होतं. पण ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा अध्यादेश फेल गेल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

मोदींचं मराठीत ट्विट; पांडुरंगाच्या चरणी केली ‘ही’ प्रार्थना

“काहीही न करता पैसे कसे कमवतो?”; राज कुंद्राच्या अटकेनंतर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

“मिटकरी, तोंडाला लकवा झाला होता ना तुमच्या, गावरान गाईचं तूप लावा”

“महाराष्ट्रातील ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये तातडीने लॉकडाऊन जाहीर करा”

“मोगॅम्बोचा आव आणणारे अनिल देशमुख आता मिस्टर इंडिया झालेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More