बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आता विरोधकांच्या जीभा कापूनच त्या…’, शिवसेना मोदी सरकारवर बरसली

मुबंई | लोकसभा सचिवालयाकडून लोकसभा (LokSabha) आणि राज्यसभेमध्ये काही वापरल्या जाणाऱ्या शब्दानां निर्बंध घालण्यात आले आहेत. या शब्दाचा वापर संसदेत करणं असंसदीय मानलं जाणार आहे. आता संसदेत भाषण करताना हे मूळ शब्द वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. हे शब्द वापरल्यास तुम्हाला संसदेतून निलंबित केलं जाऊ शकतं, अशी माहिती समोर आली आहे. याविरूद्ध शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून केंद्र सरकारवर टिका करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) गद्दारीचा प्रयोग घडवून लोकशाहीचा गळा घोटलाच आहे. या तानाशाहिवर संसदेत आवाज उठवताना सदस्यांनी काय व कसे बोलायचे ? विरोधकांच्या जीभा कापूनच त्या घटनेच्या,स्वात्र्यतांच्या चितेवर ठेवल्या आहेत. संसदेत सदस्यांनी सभ्य व संस्कृत भाषेचा वापर करायचा. तेच सत्तधाऱ्यांनी संसदेच्या बाहेर फवारे उडवायचे हे चालेल का? मग संसदेतील तानाशाही हा नियम बाहेरही लावा व देशाच्या जिभेची टाळेबंदी केली आहे असे जाहीर करा. हे तर आणीबाणीपेक्षा भयंकर आहे!!, असा आरोप सामनातून करण्यात आला आहे.

तुम्ही संसदेतही आम्ही सांगू तेच बोलायचे आणि संसदेबाहेरही आम्ही सांगतो तसेच वागायचे असा एकाधिकारशाहीचा वरवंटा फिरवला जात आहे. लोकशाही ही अशोक स्तंभावरील गुरगुरणाऱ्या सिंहासारखीच असायला हवी. पण सध्या राज्यकर्तेच गुरगुरत आहेत व संसदेचा भित्रा ससा (The rabbit) करून ठेवला आहे, असही सामनातून म्हटलं आहे.

संसद ही देशाची सर्वात मोठी न्यायपालिका (Judiciary) आहे. लोकसभा व राज्यसभेच कामकाज सभ्य, सुसंस्कृत, विनम्रतेनेच चालले पाहिजे. पण संसदेचा तो गौरव, सन्मान आज खरोखरच राहिला आहे काय? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे. हरिशंकर परसाई यांनी म्हटले आहे, “हुकूमशहा हा एक डरपोक माणूस असतो. चार गाढवे एकत्र चरत असली तरी त्याला भीती वाटते की, आपल्याविरुद्ध कटकारस्थान चालले आहे’’ आजचे चित्र यापेक्षा वेगळे दिसत नाही’ अशी टीका सेनेनं सामनातून केली आहे.

थो़डक्यात बातम्या

भाजपच्या मध्यस्तीमुळे शिंदे-ठाकरेंची भेट होणार?, शिवसेना नेत्याच्या ट्विटने खळबळ

‘शिंदे-फडणवीस हा फेव्हिकॉलचा जोड त्यामुळे…’, स्नेह भोजनात आमदारांना सूचना

‘…अन् त्यानंतर मी एकदाही उद्धव ठाकरेंशी बोललो नाही’, उदय सामंत स्पष्टच बोलले

उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून जगदीप धनगड यांना उमेदवारी, शेतकरी पुत्राबद्दल जाणून घ्या सर्वकाही

‘राज्यात हे काय सुरू आहे?’; संजय राऊतांचा थेट राज्यपालांना प्रश्न

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More