बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरेंच्या आदेशानेच मी अजित पवारांवर पातळी सोडून टीका केली”

मुबंई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात जवळ-जवळ 40 आमदारांचा समावेश होता. बंडखोर आमदारांची शिवसेनेसोबत बंड करण्याची कारणं सतत बदलत होती. एक कारण मात्र सगळ्यांचं स्पष्ट होतं ते म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut). राऊतांची भाषा योग्य नसल्याचा अनेकांनी आरोप केला. आता पुन्हा एका बंडखोर आमदारांनी राऊतांवर आणि उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे.

2019 च्या लोकसभेवेळी अजित पवारांबद्दल विजय शिवतारे यांनी खालच्या पातळीतील वक्तव्य केलं होतं. त्याबद्दल त्यांना प्रंचड वाईट वाटत असल्याचं आणि पश्चाताप होत असल्याचं शिवतारे यांनी सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले 2019 लोकसभा निवडणूकीवेळी मावळ येथे अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या विरोधात श्रीरंग बारणे (Srirang Barne) यांना उभं करण्यात आलं होतं. शिवतारे पवारांवर बोलण्यासाठी तुमच्याशिवाय दुसरा प्रचारक नाही. त्यामुळे मावळची जबाबदारी तुमच्याकडे असं मला आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आणि जबाबदारी दिली, असा खुलासा त्यांनी केला.

विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली होती. यावर त्यांनी सांगितलं हकालपट्टी करण्याआधीच मी राजीनामा दिला होता. पत्रकार परिषद घेत मी माझी भूमिका मांडली होती. महाविकास आघाडी आम्हाला आधीपासूनच मान्य नव्हती. संजय राऊतांमुळेच माझा विधानसभेत पराभव झाला, असा आरोप त्यांनी राऊतांवर केला आहे.

संजय राऊतांनी हे सगळं घडवून आणलंय. शरद पवारांशी, शिवसेनेशी राऊतांची निष्ठा किती आहे. याची संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्राला सगळं कळतय मग उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना का कळत नाही.?, असा सवाल शिवतारेंनी केला आहे.

थोडक्यात बातम्या

‘पीठ से निकले.. खंजरों को गिना जब…’; संजय राऊतांचं नवं ट्विट चर्चेत

“उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींना भेटले, म्हणाले मलाही युती करायचीये”

“सत्तेच्या नशेत धुंद झालेले बंडखोर महापुरुषांच्या प्रतिमा ढकलून देत आहेत”

‘त्या’ भेटीचा उल्लेख करत खासदार राहुल शेवाळेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

‘…म्हणूनच हे बारा खासदार माझ्याकडे आलेत’; एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More