बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आम्ही केलं की घोडेबाजार, तुम्ही केलं की शॉपिंग’- धनंजय मुंडे

मुंबई | 17 ऑगस्टपासून राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास (Monsoon Session) सुरूवात झाली आहे. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सत्ताधाऱ्यांचे जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टोलेबाजी केली.

‘आम्ही केलं की घोडेबाजार आणि तुम्ही काही केलं की शॉपिंग’, अशा शब्दांत मुंडेंनी भाजपला खडेबोल सुनावले. धनंजय मुंडे म्हणाले, ‘एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) 40 आमदारांना सोबत घेऊन गेले आणि स्वत: मुख्यमंत्री झाले. रिक्षावाला ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे. पण जेव्हा नगराध्यक्ष जनतेतून निवडून यावे असं सांगितलं तेव्हा मात्र शिंदेंचे नगरसेवक नाराज झाले. हे स्वत: मुख्यमंत्री झाले, मग आमची संधी का हिरावली असा सवाल नगरसेवकांकडून होत आहे.’

‘मुख्यमंत्री देखील जनतेतून निवडून द्या. 120 आले तरी विरोधीपक्षात राहावं लागलं. सत्ता आली तरी उपमुख्यमंत्रिपदी बसावं लागलं. आम्ही केलं की घोडेबाजार आणि तुम्ही काय केलं की शॉपिंग?’ अशी खोचक सवालयुक्त टीका मुंडेंनी भाजपवर केली आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More