बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“टीकाकारांनी टीका केली पण स्वत: सरकारनेच उत्तर दिलंय”

मुंबई | महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेची चौकशी केली आहे. यासाठी जलसंधारण विभागाकडून चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशीमधून आता या योजनेचा फायदा झाला असल्याचं समोर आलं आहे. असा निष्कर्श या समितीकडून काढला आहे. या सर्व प्रकरणावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

समितीने जलयुक्त शिवार योजना कशी योग्य आहे आणि काम कसं योग्य झालं आहे, असा अहवाल दिला होता. हा समितीचा अहवाल उच्च न्यायालयाने देखील स्वीकारला होता. त्यामुळं आता आलेला अहवाल त्यावरूनच करण्यात आला असेल. त्यामध्ये काही तक्रारी असू शकतात हे खरं आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आम्हीच तक्रारी केल्या होत्या की, 600 वेगवेगळ्या तक्रारी आल्या आहेत. त्या सर्व तक्रारींची चौकशी केली जाईल. त्यासाठी काहीच हरकत नाही. पण 6 लाख कामांमधून फक्त 800 किंवा 600 कामांची चौकशी होणं ही मोठी गोष्ट नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेवर सातत्याने टीका होत होती. यासंदर्भात फडणवीस यांनी म्हटलं आहे की, टीकाकारांनी टीका केली आहे आणि उत्तर पण सरकारनेच दिलं आहे. चौकशी झाली पाहिजे. मी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही. तसेच यासाठी कोणत्या योजनेला बदनाम करणं चुकीचं ठरू नये, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या –

सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला दणका! पेगासस प्रकरणी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

‘वानखेडेंनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या’; आणखी एका साक्षीदाराचा धक्कादायक खुलासा

“मी आजही हिंदूच, आईची इच्छा होती म्हणून मी…”

समीर वानखेडे यांचा निकाह लावून देणारे मौलाना आले समोर; केले ‘हे’ धक्कादायक खुलासे

देवेंद्र फडणवीसांच्या ‘या’ महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टला अखेर ठाकरे सरकारचा हिरवा कंदील

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More