Crop Insurance Scheme l राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) केवळ 1 रुपयात पीक विमा योजना (Crop Insurance Scheme) सुरू करण्यात आली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या योजनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या.
पीक विमा योजना (Crop Insurance Scheme) बंद होणार असल्याच्या अफवा पसरल्याने शेतकरी चिंतेत होते. यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी पीक विम्यातील (Crop Insurance) घोटाळ्यावरही भाष्य केले.
योजना बंद होणार नाही, पण… :
पीक विम्यात (Crop Insurance) गैरप्रकार होत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे ही योजना बंद होणार असल्याची चर्चा होती. मात्र, कृषीमंत्र्यांनी (Agriculture Minister) या चर्चा फेटाळून लावल्या. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी स्पष्ट केले की, सरकारला पीक विमा योजना (Crop Insurance Scheme) बंद करायची नाही, पण योजनेत होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी उपाययोजना आणि काही निर्णय घ्यावे लागतील.
मुख्यमंत्र्यांशी (Chief Minister) चर्चा करून निर्णय :
आवश्यक निर्णयांबाबत मुख्यमंत्री (Chief Minister) आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी (Deputy Chief Minister) चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, पीक विमा योजना (Crop Insurance Scheme) बंद होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Crop Insurance Scheme l योजनेची पुनर्रचना? :
माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी पीक विमा योजनेची (Crop Insurance Scheme) पुनर्रचना करण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, योजनेत सुधारणा करणे गरजेचे आहे, कारण काही लोक याचा गैरफायदा घेतात आणि कंपन्यांकडूनही लूटमार होते. त्यामुळे निकष बदलले जातील. अल्पभूधारक शेतकऱ्याला एक रुपयात विमा आणि इतरांना शंभर रुपयात विमा, असा निर्णय घेता येणार नाही. पिकाप्रमाणे विम्याचा दर आकारता येईल, पण सर्वांसाठी समान नियम असावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.