आरोग्य कोरोना महाराष्ट्र

धक्कदायक! फुले उधळून डिस्चार्ज दिलेल्या महिलेचा रिपोर्ट काही तासात पॉझिटिव्ह

उस्मानाबाद | उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब रुग्णालय प्रशासनाला अति आत्मविश्वास काहीसा अंगलट आला आहे. फुले उधळून डिस्चार्ज दिलेल्या कोरोनाबाधित महिलेचा रिपोर्ट अवघ्या काही तासांत पॉझिटिव्ह आला.

संबंधित रुग्णालयात तीन चाचण्या केल्या जातात.दोन चाचण्या निगेटिव्ह आल्याने तिसरीही निगेटिव्ह येईल या आत्मविश्वासाने रुग्णालय प्रशासनाने संबंधित महिलेला डिस्चार्ज दिला.

तिसरा अहवाल संध्याकाळी येणार होता, मात्र त्यापूर्वीच दुपारी या महिलेला डिस्चार्ज देण्यात आला. पण संध्याकाळी या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मागील अकरा दिवसांपूर्वी कळंब तालुक्यातील तीन जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात पाथर्डी येथील मुंबई वरुन परतलेल्या पती-पत्नीचा समावेश होता. त्यांच्यावर कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे- संजय राऊत

“आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील”

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेतोय; हर्षवर्धन जाधव यांचा खुलासा

‘या’ नेत्याने जाहीर केली राजकीय निवृत्ती; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई ते वर्धा पायपीट करत गावी परतलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या