बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पक्षाकडून बंदी मात्र ‘राष्ट्रवादी युवक’कडून गर्दीच्या कार्यक्रमांचा धडाका सुरु

गचिरोली | राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. मात्र पुन्हा तिसरी लाट येण्याचा धोका टळला नाही. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या आकडेवारीमध्ये वाढ होताना दिसत आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी अद्यापही जनतेवर काही निर्बंध लादले आहेत. मात्र  दुसरीकडे सत्तेतील मित्र पक्ष गर्दी होणारे कार्यक्रम घेताना दिसत आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी आपल्या कार्यक्रमांचा धडाका सुरूच ठेवला आहे. त्यांच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे, कार्यक्रमामध्ये सोशल डिस्टन्सिंग राखणं, मास्क लावणं, अशा अनेक नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही इथून पुढे गर्दीच्या कार्यक्रमाला जाणार नाही, असं सांगितलं होतं. मात्र त्यांच्याच पक्षातील युवा नेता मुख्यमंत्र्यांच्याच नाहीतर पवांरांच्याही आदेशाला केराची टोपली दाखवत आहे.

No description available.

कोरोना व्हायरसच्या आधीच्या लाटांवरून मी सत्ताधारी, विरोधक आणि सर्व राजकीय पक्ष व संघटनांना विनंती करतो, आता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. परंतु सत्तेतील मित्रपक्षातील नेतेच जर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असतील तर विरोधकांना निशाणा साधण्याची आयती संधी मिळाली आहे.

दरम्यान, गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम घेण्यास पक्षाच्यावतीने मनाई करण्यात आली असून तसे कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून होणार नाहीत, अशी पक्षाची भूमिका असल्याचं राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनीही सांगितलं होतं. मात्र इकडे शेख यांच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे.

No description available.

थोडक्यात बातम्या- 

मनोहर भोसले प्रकरणात नवी घडामोड, ‘त्या’ दोन जणांचा शोध सुरु!

अमरावतीच्या वर्धा नदीत मोठी दुर्घटना; बोट उलटून 11 जण बुडाल्याची भीती

कौतुकास्पद! मुलगी झाली म्हणून पाणीपुरी विक्रेत्यानं वाटली ‘इतक्या’ हजार लोकांना मोफत पाणीपुरी

मास्क किती दिवस लावायचं???; नीती आयोगाने दिलं स्पष्टीकरण

देश जोडण्याबद्दल बोललं की लोकांना त्रास होतो- कंगणा राणावत

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More