बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोल 30 रुपये लिटर द्या, कॉंग्रेसची मागणी

मुंबई | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती बुधवारी पुन्हा गडगडल्या. तेलाच्या किमतीत 26 टक्क्यांनी घट झाल्याने 18 वर्षांतील निच्चांक गाठला. कोरोना व्हायरस जगभर थैमान घालत असल्यामुळे गेल्या महिन्यात तेलाची मागणी केवळ 51 टक्क्यावर आली आहे.

कोरोना व्हायरसमुळे मंदावलेली मागणी, तसेच सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यात वाढलेल्या जागतिक दरयुद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या. त्यामुळे पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनाचे दर 30 रुपये प्रतिलिटर करण्याची मागणी काँग्रेसने केली.

रद्द झालेल्या सहलीच्या पार्श्वभूमीवर एअरलाइन्स आणि क्रूझ जहाजांमध्ये होणाऱ्या इंधनाच्या मागणीला जोरदार फटका बसला आहे. त्यातच उत्पादन कपातीवर सहमती न झाल्यामुळे जागतिक बाजारपेठेत चढाओढ सुरु आहे.

दरम्यान, वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटने (डब्ल्यूटीआय) बुधवारी प्रति बॅरल 23.41 डॉलर दराने तेलाची विक्री केली. 2002-03 मध्ये इतक्या कमी दराने कच्च्या तेलाची विक्री झाली होती.

 

ट्रेंडिंग बातम्या-

आपण जागतिक यु्द्ध लढत आहेत, घाबरून युद्ध जिकंलं जात नाही- उद्धव ठाकरे

सॅल्युट… आईची रुग्णालयात मृत्यूशी झुंज; आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची काळजी!

महत्वाच्या बातम्या-

बायकोला न सांगता मैत्रीणीला घेऊन इटलीला फिरायला गेला अन् कोरोना घेऊन परत आला

चिकन, मटन खाल्याने कोरोना होत नाही- शरद पवार

“आम्हाला फासावर लटकवल्याने बलात्कार थांबणार नाहीत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More